Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीNew Rules : सामान्यांच्या खिशाला कात्री! जून महिन्यात होणार 'हे' महत्त्वाचे बदल

New Rules : सामान्यांच्या खिशाला कात्री! जून महिन्यात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

जाणून घ्या कशी असेल नवी नियमावली

मुंबई : जून महिना सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले असून नव्या महिन्यात अनेक आर्थिक नियमांत बदल होणार आहे. बदललेल्या नियमांमुळे थेट आपल्या खिशावर परिणाम होणार असून काही वस्तू महागणार आहेत तर काही स्वस्त होणार आहेत. जाणून घ्या याबबातची सविस्तर माहिती.

गॅस सिलिंडरच्या दरात होणार बदल

देशातील ऑईल मार्केटिंग कंपन्या या गॅस सिलिंडरच्या किंमती ठरवत असतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिडंरच्या दरात बदल होत असतो. त्यामुळे येत्या एक जूनपासून गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार असून यंदा गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार की वाढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आधारमध्ये बदल करण्यासाठीच्या मुदतीत वाढ

यूआयडीएआयच्या एका निर्णयामुळे सामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. कारण यूआयडीएआयने आधारमध्ये मोफत बदल करण्याची मुदत वाढवून दिली आहे. म्हणजेच आता १४ जूनपर्यंत सामान्य लोकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधार कार्डमध्ये बदल करता येईल. मात्र आधार सेंटरवर जाऊन आधार कार्डमध्ये बदल करायचा असल्यास प्रत्येक अपडेटसाठी ५० रुपये द्यावे लागतील.

वाहतुकीच्या नियमात आणखी मोठे बदल

येत्या १ जूनपासून वाहतुकीच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. कोणत्याही व्यक्तीने या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतो. वेगाची मर्यादा ओलांडत एखाद्या व्यक्तीने गाडी चावल्यास २००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. लायसन्स नसताना गाडी चालवल्यास ५०० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. हेल्मेट नसताना किंवा सिट बेल्ट नसताना गाडी चालवल्यास संबंधित व्यक्तीला १०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

…तर भरावा लागणार २५ हजारांचा दंड

येत्या जून महिन्यात वाहतुकीच्या अनेक नियमांत बदल करण्यात येणार आहे. कोणताही अल्पवयीन मुलगा गाडी चालवताना दिसल्यास त्याच्या पालकांकडून मोठा दंड आकारला जाणार आहे. हा दंड २५ हजार रुपयांपर्यंत असू शकतो. तर २५ वर्षांपर्यंत लायसन्स देण्यात येणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -