Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीNawab Malik : नवाब मलिक अखेर सत्ताधार्‍यांच्या बाकावर!

Nawab Malik : नवाब मलिक अखेर सत्ताधार्‍यांच्या बाकावर!

विधीमंडळात स्पष्ट झाली भूमिका

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Rashtravadi Congress Party) पाच महिन्यांपूर्वी फूट पडली तेव्हा अनेक आमदारांनी अजित पवारांची (Ajit Pawar) साथ दिली तर काहीजण शरद पवारांच्या (Sharad Pawar) साथीला राहिले. या संपूर्ण उलथापालथीत राष्ट्रवादीचे विश्वासू नवाब मलिक (Nawab Malik) मात्र मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात होते. त्यांच्या आजारपणामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. ते बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांना आपल्याला पाठिंबा द्यावा याकरता गळ घातली होती. मात्र, नवाब मलिकांची भूमिका अनेक दिवस स्पष्ट होत नव्हती.

ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने आपल्याकडे राष्ट्रवादीच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४२ आमदार पाठीशी असल्याचा दावा केला होता. यातील ४१ आमदारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत होती, मात्र ४२वे आमदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार गटाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार आहेत, असे सांगण्यात येत होते. मात्र नवाब मलिकांनी यावर स्पष्टता दिली नव्हती.

आज नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. यामध्ये नवाब मलिक सत्ताधार्‍यांच्या जागी शेवटच्या बाकावर बसलेले दिसले. म्हणजेच अखेर मलिकांनी अजितदादांच्या गटाला पाठिंबा दिला आहे, हे स्पष्ट झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -