Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीNagpur Winter session : सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी : देवेंद्र फडणवीस

Nagpur Winter session : सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी : देवेंद्र फडणवीस

शेतकर्‍यांच्या प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

नागपूर : नागपुरात आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Nagpur Winter session) सुरुवात झाली. मात्र, कामकाज सुरु होण्यापूर्वीच विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू केली. गळ्यात संत्र्यांची माळ आणि हातात निषेधाचे पोस्टर्स घेऊन विरोधकांनी आंदोलन केले. या प्रकरणी अधिवेशन सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही. चाळीस तालुके हे केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे दुष्काळी घोषित झाले. जे निकषात बसत नाहीत पण नुकसान झालेलं आहे, त्यांना राज्य सरकारने स्वतःच्या पैशातून मदतीचं आश्वासन दिलं आहे. १२०० मंडळांना दुष्काळसदृश घोषित करण्यात आलं आहे. दुष्काळी घोषित केलेल्यांना जे मिळणार आहे तेच दुष्काळसदृशांना मिळणार आहे, आम्ही कुठेही भेदभाव करत नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आमचं सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं आहे. मागच्या वर्षीदेखील माननीय मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या मदतीसाठी दिले. याहीवर्षी राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा वीस लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये २५ टक्के अंतरिम गेले आहेत. शेतकर्‍यांचं दुष्काळामुळे झालेलं नुकसान असो, अतिवृष्टी किंवा गारपीट किंवा अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान असो या सगळ्या प्रकारच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी प्रक्रिया सुरु झालेली आहे.

पुढे ते म्हणाले, याव्यतिरिक्त दोन हेक्टरांऐवजी आता निकष तीन हेक्टरांचा करण्यात आला आहे. मागच्या वेळी एनडीआरएफच्या (NDRF) दुप्पट मदत आपण केली होती. म्हणजे नियमांपेक्षा नेहमीच जास्त देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आजही कोणत्याही परिस्थितीत महायुती सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभं राहील आणि या अडचणीच्या परिस्थितीत शेतकर्‍याला पूर्ण मदत करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -