Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीGovernment Job : युवकांसाठी आनंदाची बातमी! मुंबईतील 'या' मोठ्या संस्थेत नोकरीची संधी

Government Job : युवकांसाठी आनंदाची बातमी! मुंबईतील ‘या’ मोठ्या संस्थेत नोकरीची संधी

बीएमसी आणि टाटा मेमोरीयलमध्ये मेगाभरती

असा करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्या अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. मुंबई शहराचे नियोजन आणि व्यवस्थापन करणारी मुंबई महानगर पालिका आणि मुंबईतील मोठ्या संस्थांपैकी टाटा मेमोरियल संस्थेमध्ये सध्या मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे मुंबईत सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. या दोन्ही ठिकाणांच्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

मुंबई पालिकेअंतर्गत लायसन्स इन्स्पेक्टरच्या एकूण ११८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १७ मे २०२४ पर्यंत अर्ज करता येणार असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पात्रता आणि पगार

मुंबई पालिकेअंतर्गत लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय ४३ वर्षे इतके आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भरतीची वेतनश्रेणी स्तर M17 नुसार पगार दिला जाईल. हा पगार २९ हजार २०० ते ९२ हजार ३०० रुपयांपर्यंत असणार आहे.

अर्ज प्रक्रिया आणि लागणारे शुल्क-

  • मुंबई पालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • तेथे लायसन्स इन्स्पेक्टर भरतीची पीडीएफ दिसेल. येथे भरतीचे शुद्धीपत्रक पाहा.
  • तसेच शेजारी ऑनलाइन अर्जाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि अर्ज भरा.
  • खुल्या प्रवर्गातील अर्जदारांकडून १ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना यामध्ये १०० रुपयांची सवलत आहे. त्यामुळे त्यांच्या अर्जाचे शुल्क ९०० रुपये आहे.

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये मेगा भरती

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, HBNI फेलोशिपसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना २२ मे २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. १८ ते ४० वर्ष वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करु शकणार आहेत. तसेच पात्र उमेदवारांना अर्ज करताना १ हजार रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -