Sunday, May 19, 2024
Homeक्राईमCyber Crime : मित्रासोबतचे वाद मिटवण्याच्या नादात ज्योतिषाने लावला चुना!

Cyber Crime : मित्रासोबतचे वाद मिटवण्याच्या नादात ज्योतिषाने लावला चुना!

जाणून घ्या नक्की प्रकरण काय?

मुंबई : देशभरात मोठ्या प्रमाणात सायबर जाळे पसरत आहे. कधी अकाउंट हॅक करणं तर कधी खोटी व्यक्ती बनून फसवणूक करण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. अशीच फसवणूक करणाऱ्या लबाड्यांच्या जाळ्यात मुंबईतील एक तरूणी अडकली. मित्रासोबतचे मतभेद मिटवण्यासाठी एका २४ वर्षीय तरुणीने ऑनलाईन अनोळखी ज्योतिषाची मदत घेतली होती. मात्र, यामार्फत ती सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकली आणि तिला हजारो रुपयांचा चुना लावण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुज पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला मोबाईलमधील एका सोशल मीडिया अ‍ॅपवर एका ज्योतिषाबाबत चॅटिंगसाठी लिंक आली होती. तिने त्यावर क्लिक केले असता तिला एक मोबाईल नंबर मिळाला. तरुणीने तिच्या व्हाट्सअप क्रमांकवरून चॅटिंग सुरू केल्यावर समोरच्या व्यक्तीने तो ज्योतिषी असल्याचे सांगत व्हॉट्सॲप कॉल करत तरुणीची माहिती मागितली. त्यानुसार तिने माहिती आणि तिचा फोटो त्या भामट्यांना पाठवला. समोरील व्यक्तीला तक्रारदाराने फोन केल्यावर त्याने तिला ६ हजार १०० रुपये पाठवायला सांगत एक क्यूआर कोड शेअर केला.

तरुणीने पैसे पाठवल्यानंतर पुन्हा तिच्याकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच ‘तुला मित्राकडून फोन येईल पण तो तू रिसीव्ह करू नको’ असे भामट्यांनी सांगितले. कारण, त्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडत तो फेक कॉल आहे हे तिला समजले असते. तरुणीने त्यांच्यावर विश्वास ठेवत फोन उचलला नाही. मात्र नंतर तिने तिच्या मित्राला फोन केल्यावर त्याने तिला फोन केलाच नसल्याचे सांगितले आणि हा फसवणूकीचा प्रकार तिच्या लक्षात आला. या विरोधात तिने सांताक्रुज पोलिसात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -