Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIPL 2024PBKS vs CSK : पंजाबचा विजयी सिक्सर हुकला, चेन्नईने २८ धावांनी चारली...

PBKS vs CSK : पंजाबचा विजयी सिक्सर हुकला, चेन्नईने २८ धावांनी चारली पराभवाची धूळ

मुंबई: पंजाब किंग्स(punjab kings) आणि चेन्नई सुपर किंग्स(chennai super kings) यांच्यात आयपीएल २०२४चा(ipl 2024) ५३वा सामना धरमशालामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सला २८ धावांनी हरवले. रविवारी धरमशाला येथे एचपीसीए स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात यजमान पंजाब संघाला विजयासाठी १६८ धावांचे आव्हान मिळाले होते.

याचा पाठलाग करताना पंजाबचा संघाला ९ विकेटमध्ये १३९ धावा करता आल्या. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाती सीएसकेचा ११ सामन्यांतील हा सहावा विजय आहे. तर ते पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्सचा हा ११ वा सामन्यातील सातवा पराभव आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा हिरो रवींद्र जडेजा ठरला. त्याने ऑलराऊंडर कामगिरी केली. जडेजाने आधी ४३ धावा केल्या. त्यानंतर तीन विकेट घेतल्या. पंजाब किंग्सकडून फलंदाजीत प्रभसिमरन सिंह आणि शशांक सिंह यांनी कमाल केली. प्रभसिमरनने ३० आणि शशांक सिंहने २७ धावा केल्या. चेन्नईकडून जडेजाशिवाय सिमरजीत सिंह आणि तुषार देशपांडेने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. दोन्ही वेगवान गोलंदाजांनी दोन दोन विकेट घेतल्या.

खातेही खोलू शकला नाही धोनी

सामन्यात टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना चेन्नई सुपर किंग्सने ९ बाद १६७ धावा केल्या. सीएसकेसाठी रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४३ धावा केल्या. जडेजाने २६ बॉलमध्ये आपल्या खेळीदरम्यान तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ३२ आणि डेरिल मिचेलने ३० धावा केल्या. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी खातेही खोलू शकला नाही. पहिल्या बॉलवर बाद झाला. त्याला हर्षल पटेलने क्लीन बोल्ड केले. पंजाबसाठी हर्षल पटेल आणि राहुल चाहरने तीन-तीन विकेट घेतल्या. तर अर्शदीपला दोन बळी मिळवण्यात यश मिळाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -