Sunday, May 19, 2024
Homeनिवडणूक २०२४PM Modi : मोदींच्या सभेला गर्दी; लोखंडे आणि विखेंचा विजय निश्चित

PM Modi : मोदींच्या सभेला गर्दी; लोखंडे आणि विखेंचा विजय निश्चित

अहमदनगर : शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) आणि नगरचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना मिळणारं प्रत्येक मत केंद्रात नरेंद्र मोदींना (Narendra Modi) अधिक मजबूत करेल. त्यामुळे नगरकरांनी अधिकाधिक मतदान करणे गरजेचे असून, याआधीच्या निवडणुकांचे सर्व रेकॉर्ड मोडून काढावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरकरांना केले. तुम्ही जर पोलिंग बूथ जिंकले तर मी अगदी सहजतेने सर्व लोकसभा जिंकेन, असा विश्वासही मोदींनी (PM Modi) व्यक्त केला.

नगरकरांमध्ये सर्व बूथ जिंकवून देण्याची ताकद असल्याचेही ते म्हणाले. ते अहमदनगर येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

नगरमधील सभेला संबोधित करण्यासाठी उभ्या राहिलेल्या मोदींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणाची सुरूवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी अभिवादन करत मराठीतून केली. अहिल्यानगर भूमिला मी अभिवादन करतो, असे ते म्हणाले. देशाचा तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असून, भाजप आणि मोदींविरोधात उभ्या ठाकलेल्या इंडी आघाडीची एक्सपायरी डेट ४ जून असल्याचेही मोदींनी सांगून टाकले.

यावेळी मोदी म्हणाले की, काँग्रेसने आपला जाहीरनामा पूर्णपणे मुस्लिम बनवला आहे. काँग्रेसकडे बोलण्यासाठी काहीच मुद्दे राहिलेले नसून, ५० वर्ष काँग्रेसने फक्त गरिबी हटवण्याचे खोटी आश्वासन दिल्याचे मोदी म्हणाले. तुमचं एक मत थेट मोदींच्या खात्यात जाणार आहे. त्यामुळे विचार करून मतदान करा, असे आवाहन मोदींनी मतदारांना केले. देशात आणखीन विकास होणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचे सरकार अनेक योजना आणत असल्याचेही मोदी म्हणाले.

अहमदनगरमधून भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील विरूद्ध मविआचे निलेश लंके यांच्यात थेट लढत होत आहे. नुकतीच निलेश लंकेसाठी शरद पवारांनी प्रचार सभा घेतली होती. मात्र, त्या सभेच्या तुलनेत आजच्या मोदींच्या सभेला विराट जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळे सुजय विखेंच्या विरोधात मैदानात उतरलेल्या निलेश लंकेंच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. मोदींच्या सभेला झालेली गर्दी बघता लोखंडे आणि विखेंचा विजय निश्चित मानला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -