Sunday, May 19, 2024
HomeदेशArvind Kejriwal : केजरीवाल यांना दिलासा नाहीच! २० मे पर्यंत कोठडीत वाढ

Arvind Kejriwal : केजरीवाल यांना दिलासा नाहीच! २० मे पर्यंत कोठडीत वाढ

सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली : दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्यात (Liquor policy scam) आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी संपत नसल्याचे चित्र आहे. ईडीने (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या (Money Laundering) आरोपाखाली २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. महिना उलटून गेल्यानंतरही केजरीवाल यांची कोठडीतून सुटका झालेली नाही. याउलट त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे, सुप्रीम कोर्टाची (Supreme Court) सुनावणी पुढे ढकलल्यामुळे केजरीवाल यांच्या कोठडीमध्ये २० मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन देण्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाने यावेळी सुनावणीदरम्यान म्हटलं होतं की की, ‘केजरीवाल हे सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार देखील करायचा आहे. ही असामान्य स्थिती आहे. तसेच केजरीवाल हे काही वारंवार अपराध करणारे व्यक्ती नाहीत.’ न्यायमूर्ती संजिव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने यासंदर्भात सुनावणी घेतली.

केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यास ईडीने विरोध दर्शवला होता. यामुळे चुकीचा पायंडा पडेल. तसेच एक सामान्य व्यक्ती आणि एका पदावरील व्यक्तीमध्ये असा भेदभाव करणे योग्य नाही. शेतकऱ्याला शेतात धान्य पेरायचं म्हणून त्याला जामीन मंजूर केला जाईल का, अशा प्रकारचा युक्तीवाद ईडीच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला होता.

सुप्रीम कोर्टाने यावर म्हटलं होतं की, ‘लोकसभा निवडणुका या दर पाच वर्षांनी होतात. चार किंवा सहा महिन्यांनी शेतातील पेरणीसारखी ही घटना नाही. ही असामान्य स्थिती आहे. आम्हाला याप्रकरणी केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यासाठी प्राधान्याने विचार करावा लागेल.’ कोर्टाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय अडीच वाजेपर्यंत राखून ठेवला होता.

केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळण्याची शक्यता होती. पण, तसं होऊ शकलेलं नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २० मेपर्यंत केजरीवाल कोठडीतच असणार आहेत. त्यामुळे हा आपसाठी मोठा धक्का आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -