Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीतिसऱ्या टप्पासाठी आज मतदान

तिसऱ्या टप्पासाठी आज मतदान

महाराष्ट्रातील ११ जागांसह १२ राज्यांतील ९४ जागांवर उमेदवारांचे भवितव्य आज होणार ईव्हीएममध्ये बंद

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी, ७ मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ जागांसह १२ राज्यांतील ९४ जागांवर उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सकाळी ७ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५ वाजता संपेल. या टप्प्यात बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ,गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या काही प्रमुख राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे हा खूप निर्णायक टप्पा मानला जात आहे.

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात बारामतीत मतदान होणार आहे. राज्यातील सर्वांधिक हायव्होल्टेज लढत या मतदारसंघात होत असून सर्व देशाचे लक्ष मतदारसंघाकडे लागले आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या मैदानात आहेत तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ननंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधुन केंद्रीय मंत्री नारायण राणे तर सातारा मतदारसंघातून उदयनराजे निवडणूक लढवत आहेत. सोलापुरमधून महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या मैदानात आहेत तर महायुतीकडून राम सातपुते निवडणूक लढवत आहेत. तर कोल्हापूरमध्ये महायुतीच्या संजय मंडलिक आणि मविआच्या छत्रपती शाहू महाराजांमध्ये सामना रंगणार आहे.

दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह गुजरातमधील सर्व २६ जागांसाठी मतदान होणार आहे. तर कर्नाटकमधील १४, उत्तर प्रदेशातील १०, मध्य प्रदेशातील ८, बंगालमधील ४, गोव्यातील २, दमण आणि दीवमधील १, बिहारमधील ५, आसाममधील ४ आणि छत्तीसगडमधील ७ जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी लोकसभा जागेसाठीही मतदान होणार होते, मात्र या मतदारसंघातील मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे. येथे २५ मे रोजी मतदान होणार आहे. या सर्व जागांसाठी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न

राज्यात आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घटलेली आहे. वाढत्या उन्हाचाही परिणाम या लोकशाहीच्या महोत्सवावर झाला असल्याचे दिसून आले आहे. मतदान केंद्रावरील गैरसोयीचा परिणाम टक्केवारीवर होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्यासाठी थंड पाणी, सावलीसाठी ७८९ केंद्रावर पेंडोल, केंद्रावरील खोल्यांमध्ये पंखा, बसण्यासाठी खुर्च्या अशा प्रकारे सर्व सुसज्ज सुविधा उपलब्ध करुन मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच तयारी केली होती. मात्र, गेल्या ८ दिवसांपासून वाढते कडाक्याचे ऊन, वातावरणातील वाढलेली आर्द्रता, यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे.

मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्रावर प्रथमोपचार पेटी, आरोग्य कर्मचाऱ्यांकडे ओआरएस उपलब्ध असणार आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रात रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सेवा दिली जाणार आहे. याकरिता आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारीही राबणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी असे 1 हजार 648 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी आरोग्याच्या दृष्टीने केंद्रावर केवळ प्राथमिक उपचार आणि गरज भासेल त्याच ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाणार होते. पण वाढत्या उन्हामुळे प्रशासनालाही नियोजनात बदल करावा लागला आहे. विशेषत: केंद्रावर पिण्याचे पाणी आणि सावली या मुख्य बाबींवर भर दिला जात आहे.

या लोकशाहीच्या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे याकरिता गेल्या काही दिवसांपासून जनजागृती केली जात आहे. मतदानाचे महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने पटवून दिले जात आहे. आता जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नाला कितपत यश मिळणार हे उद्याच्या मतदानाच्या टक्केवारीवरुन समोर येणार आहे.

मतदान केंद्रावर उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे कोणताही त्रास होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी 1648 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान सुरळीत आणि व्यवस्थित पार पडावं यासाठी सशस्त्र पोलीस दलासह 244 अधिकारी, 3768 अंमलदार आणि 1800 होमगार्डचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जवळपास बहुतेक मतदान केंद्र हे सीसीटीव्हीला जोडण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -