Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीUber Fake Fare Scam : सावधान! चालकांची हातचलाखी; उबरने दिला सतर्कतेचा इशारा

Uber Fake Fare Scam : सावधान! चालकांची हातचलाखी; उबरने दिला सतर्कतेचा इशारा

‘अशा’ प्रकारे होतेय प्रवाशांची लूट

मुंबई : देशभरात विविध प्रकारचे स्कॅम होत असतानाच आणखी एका नव्या स्कॅमची भर पडली आहे. ऑनलाईन कॅब सुविधा पुरवणाऱ्या उबर कंपनीने सध्या मार्केटमध्ये ‘फेक फेअर स्क्रीन’ हा स्कॅम होत असल्याचं सांगितलं आहे. प्रवाशांनी याबाबत सावधानता न बाळगल्यास त्याचा मोठा भुर्दंड बसू शकतो, असा सतर्कतेचा इशारा उबरने दिला आहे. जाणून घ्या नक्की प्रकरण काय व यापासून तुम्ही कसा बचाव करु शकता.

उबरने दिलेल्या माहितीनुसार, कित्येक ठिकाणी हा स्कॅम समोर आला आहे. यामध्ये ट्रिप पूर्ण झाल्यानंतर चालक हे प्रवाशांना बिलाची रक्कम दाखवताना हातचलाखी करतात. फोनची स्क्रीन दाखवताना ते दुसरीच रक्कम असणारी वेगळी स्क्रीन दाखवतात. स्क्रीनवर दिसत असलेल्या रक्कमेप्रमाणे प्रवास चालकांना तितकेच पैसे देतात. मात्र, ही रक्कम मूळ रकमेपेक्षा जास्त असते. उबरकडे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे कंपनीने सर्व प्रवाशांना याबाबत इशारा दिला आहे.

स्कॅमपासून ‘असा’ करा बचाव

  • आपली ट्रिप सुरू करण्यापूर्वी उबर अ‍ॅपमधील माहितीनुसार चालक आणि वाहनाच्या डीटेल्स तपासून घ्या.
  • ओटीपी शेअर केल्यानंतर ट्रिप व्हेरिफाय करा.
  • डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर ड्रायव्हरला ट्रिप एंड करायला सांगा.
  • ड्रायव्हरच्या स्क्रीनवर दिसणारी रक्कम आणि तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारी रक्कम तपासून घ्या.
  • तुमच्या स्क्रीनवर दिसणारीच रक्कम पे करा.

चालक चुकीची स्क्रीन दाखवत असल्याचा संशय आल्यास ‘या’ गोष्टी करा –

  • ड्रायव्हरला आपला डिस्प्ले रिफ्रेश करायला सांगा.
  • तुम्हीदेखील अ‍ॅप रिफ्रेश करून घ्या.
  • ड्रायव्हरच्या स्क्रीनवरील रक्कम आणि तुमच्या स्क्रीनवरील रक्कम वेगळी असेल, आणि त्याने अधिकची रक्कम घेतल्याशिवाय सोडलंच नाही तर तुमच्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट, पेमेंटचा स्क्रीनशॉट अशा गोष्टी सांभाळून ठेवा.
  • यानंतर अ‍ॅपच्या हेल्प सेक्शनमध्ये जाऊन तक्रार करा, आणि पुरावा म्हणून ते सर्व स्क्रीनशॉट्स दाखवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -