Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीआयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत मुंबई - ठाण्याचा बोलबाला

आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत मुंबई – ठाण्याचा बोलबाला

> ठाण्याच्या सिंघानियाची इप्शिता भट्टाचार्य दहावीत प्रथम > मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिशची श्रेया उपाध्ये बारावीत देशात पहिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई दहावी आणि ‘आयएससी’ बारावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून या दोन्ही परीक्षेत ठाणे आणि मुंबईतील विद्यार्थ्यांनी देशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. बारावीच्या परीक्षेत ९९.७५ टक्के गुणांसह देशात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांमध्ये ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील इप्सिता भट्टाचार्यचा समावेश आहे. तर दहावीच्या परीक्षेत ९९.८ टक्के गुणांसह पहिला क्रमांक मिळवणाऱ्या देशातील नऊ विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. त्यात मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये श्रेया उपाध्याय, कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल शाळेतील तनय शाह, चॅम्पियन स्कूलमधील अद्वय सरदेसाई, मालाडच्या चिल्ड्रन्स ॲकॅडमीतील हिया संघवी, ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील यश भसीन, सोमुया चुरीवाला, श्याम मेहता, कियारा निसार, किनारे अवनिता, प्रीत जैन तर ओमकार इंटरनॅशनल शाळेतील रुद्रा मुकादम यांचा समावेश आहे.

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन बोर्डाच्या दहावीचा निकाल ९८.९४ टक्के, तर बारावीचा निकाल ९६.९३ टक्के लागला. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाचा दहावीचा निकाल ९९.८१ टक्के, बारावीचा निकाल ९८.३४ टक्के लागला. दहावी आणि बारावीच्या निकालात पहिला क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांचा समावेश असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट झाल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेलिया परीक्षेत एकूण दोन लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी दोन लाख ३५ हजार ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात एक लाख २६ हजार ४७४ मुले, एक लाख आठ हजार ६४० मुली आहेत.

यंदाही मुलींची बाजी…

यावर्षी दहावीच्या परीक्षेत एकूण ९८.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीच्या परीक्षेत एकूण ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. आयसीएसई (दहावी) बोर्डात ९९.२१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ९८.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. आयएससी (बारावी) बोर्डामध्ये देखील मुलींची सरशी झाली आहे. बारावीत ९८.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ९५.९६ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -