Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईची लाईफलाइन ठरणाऱ्या सागरी महामार्गाला (कोस्टल हायवे) छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली. या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, राजमाता जिजाऊ यांचे वंशज विजयराव जाधव, संयोजक व्यासपीठावर उपस्थित होते.

‘छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल. मराठा समाज बांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया येथे पहिल्यांदाच साजरी होतेय याचा आनंद आहे. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक असून शिवशंभुरायांचे कार्य, योगदान जतन करणे ही आनंदाची बाब आहे.

छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव देशभरात पोहोचवला जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करण्याची तयारीदेखील शासन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. याच कोस्टर रोडच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार असा पुतळा उभारण्यात येणार आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया येथे पहिल्यांदाच साजरी होत आहे याचा आनंद आहे. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक असून शिवशंभुरायांचे कार्य, योगदान यांचे स्मरण करणे ही आनंदाची बाब आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव देशभरात पोहचवला जाईल.

फडणवीसांनी मानले आभार
छत्रपती संभाजी महाराज यांची रविवारी ३६६ वी जयंती महाराष्ट्रात साजरी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचं नाव देण्यात येणार आहे, असं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

देवेंद्र फडणवीस ट्वीट करत म्हणाले, ‘मुंबईत कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. मी १६ मार्च २०२३ रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्राद्वारे त्यांच्याकडे केली होती. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आज जयंतीदिनी अनोखी आदरांजली आहे,’ असे फडणवीसांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -