Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीChild kidnapped : मध्यप्रदेशातून बाळाची चोरी! बाळ सापडलं थेट महाराष्ट्रातल्या एका शिक्षकाकडे!

Child kidnapped : मध्यप्रदेशातून बाळाची चोरी! बाळ सापडलं थेट महाराष्ट्रातल्या एका शिक्षकाकडे!

दोन बाईकस्वार, दोन जोडपी, रिक्षावाला आणि मग शिक्षक; बाळाची सुटका करण्यासाठी पोलिसांचा थरार

का केलं होतं सहा महिन्यांच्या बाळाचं अपहरण?

पनवेल : मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) थेट महाराष्ट्रात (Maharashtra) कनेक्शन असलेली एक मोठी बातमी समोर आली आहे. एका सहा महिन्यांच्या बाळाचं अपहरण (Child kidnapped) करुन ते बाळ महाराष्ट्रात राहणार्‍या एका शिक्षकाला देण्यात आलं. मात्र हे बाळ थेट त्या शिक्षकाकडे न देता अनेकांच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवण्यात आलं. त्यामुळे या बाळाची सुटका करणं पोलिसांसाठी एक थरारच होता. या प्रकरणी अखेर सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून बाळाला त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्त करण्यात आलं आहे.

मध्य प्रदेशात एका सहा महिन्याच्या बाळाचं अपहरण झालं. ज्यावेळी पोलिसांनी अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं, त्यानंतर याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एका शिक्षकाला सहा महिन्याचं बाळ पाहिजे होतं. त्यासाठी त्याने आरोपींना २९ लाख रुपये दिले होते. या प्रकरणात कल्याण पोलिसांनी एकूण सहाजणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये मुंबईतील लिलावती रुग्णालयात काम करणारा मदतनीस, शेअर बाजारात काम करणाऱ्याची पत्नी, एक रिक्षा चालक आणि रिक्षा चालकाच्या शेजारी राहणाऱ्यांचा समावेश आहे.

नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेश येथील रिवा जिल्ह्यातील सीव्हल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रस्त्यावरुन एका बाळाचं अपहरण झालं. फेरीचं काम करणारं एक दाम्पत्य फुटपाथवर झोपलं होतं. त्याचवेळी दोन बाईक स्वार या दाप्म्पत्याजवळ आले. त्यांनी सहा महिन्याच्या बाळाला जबदरस्तीने उलचून पळ काढला. बाळाच्या आईवडिलांनी या प्रकरणाची तक्रार सीव्हील लाईन पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी त्वरीत ४०० सीसीटीव्हीजच्या साहाय्याने बाळाच्या अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. मात्र तोपर्यंत आरोपींनी बाळ महाराष्ट्रात पाठवलं होतं. कल्याणला राहत असलेल्या नितीन सोनी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याकडे बाळाला पाठवण्यात आलं होतं.

बाळाची सुटका करण्यासाठी पोलिसांचा थरार

सानी दांम्पत्य कल्याणला राहतात अशी महिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरीत कल्याण पोलिसांशी संपर्क साधला. मध्य प्रदेश पोलिसांनी थेट कल्याण गाठलं. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे आणि खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ.अमरनाथ वाघमोड यांनी सहा महिन्याच्या बाळाच्या सुटकेसाठी सहा पथके तयार केली.

कल्याणच्या खडकापाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांनी सांगितलं की, हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रदीप कोळंबेला देण्यात आलं आहे. पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतलं. प्रदीपने सांगितलं की, हे बाळ अमोल येरुणकर आणि त्याची पत्नी अर्वी येरुणकरला देण्यात आलं आहे. पोलिसांनी येरुणकर पती पत्नीला ताब्यात घेतलं. त्यांनी सांगितलं की, सहा महिन्याचं बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिलं आहे. पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेल्या बाळाची सुटका केली.

का केलं बाळाचं अपहरण?

सहा जणांच्या अटकेनंतर सहा महिन्यांच्या बाळाच्या अपहरणची कहाणी समोर आली. हे ऐकून पोलीस देखील चक्रावलेत. रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक पाटील यांना वयाच्या ५३ व्या वर्षीही मूल झालं नव्हतं. त्यांनी आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीला, जो एकेकाळी त्यांचा विद्यार्थी होता अशा अमोल येरुणकरला काहीही करुन एक बाळ आणून देण्यास सांगितलं. यासोबतच ते बाळ सहा ते सात महिन्यांचं हवं आणि ते रंगानं गोरंही असलं पाहिजे, अशा अटीशर्थी घातल्या.

अमोल हा मुंबईतील नामांकित लिलावती रुग्णलायात मदतनीस आहे. रुग्णालयातून बाळ मी चोरी करुन देतो, असं आश्वासन अमोल याने शिक्षक पाटील यांना दिलं होतं. त्यासाठी अमोलने पाटील यांच्याकडून २९ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर बाळ काही मिळत नव्हते. अमोल यांनी शेअर बाजारात काम करणारी त्यांची पत्नी अर्वीला सांगितलं. अर्वी दररोज ज्या रिक्षाने प्रवास करत होती, त्या रिक्षा वाल्याला एका बाळाची गरज आहे, असं तिने सांगितलं. त्याबदल्यात भरपूर पैसे मिळतात असंही सांगितलं.

रिक्षा चालकाने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सोनी दांपत्यास पैशाचं आमिष दाखवून एक बाळ उपलब्ध करुन द्या, असं सांगितलं. सोनी दांपत्य हे मध्य प्रदेशचं असल्याने त्यांनी रिक्षा चालकासोबत मध्य प्रदेशात जाऊन रेकी केली. बाळाच्या अपहरणाचा कट रचला. येरुणकर कुटुंबियांनी बाळासाठी घेतलेल्या पैशातून एक फ्लॅट विकत घेतला आहे. या सहा आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांच्या हवाली केले आहे. बाळालाही मध्य प्रदेश पोलिसांकडे सूपूर्द केले आहे. पोलिसांनी बाळाला त्याच्या आई वडिलांच्या हवाली केलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -