Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीTaam Ja Blue Hole : अजब गजब! ड्रॅगन होलपेक्षाही अधिक जास्त खोल...

Taam Ja Blue Hole : अजब गजब! ड्रॅगन होलपेक्षाही अधिक जास्त खोल आहे ‘हा’ खड्डा

संशोधकांच्या उंचावल्या भुवया; जाणून घ्या सविस्तर माहिती

मेक्सिको : जगभरात विविध घडामोडी घडत असताना संशोधक नवनवीन रहस्य उलगडण्याचे अथक प्रयत्न करत असतात. जगाची उत्पत्ती कशी झाली यावर संशोधकांनी उत्पत्तीमागील रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच संशोधनामध्ये एक मोठ्या गोष्टीचा खुलासा झाला आहे. जगातील सर्वाधिक खोल मानल्या जाणाऱ्या ड्रॅगन होलपेक्षाही अधिक जास्त खोल असणाऱ्या एका खड्ड्याचा शोध लागला असून संशोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या युकाटन बेटामध्ये समुद्राच्या तळाशी असणाऱ्या या अतिशय खोल खड्ड्याचं अस्तित्वं असल्याची बाब समोर आली आहे. हा खड्डा इतका मोठा आहे, की तो आतापर्यंतचा जगातील सर्वाधिक खोल खड्डा ठरत आहे. ‘ताम जा ब्लू होल’ असं या खड्ड्याचं नाव असून, तो चीनमध्ये असणाऱ्या ड्रॅगन होलपेक्षाही अधिक जास्त खोल आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांच्या मते हा ब्लू होल इतका खोल आहे की त्याचा अंत अद्यापही सापडू शकला नाही. एका स्कूबा डायव्हिंग अभियानाअंतर्गत या ‘ताम जा ब्लू होल’ची माहिती मिळाली, ज्याची खोली समुद्रतळापासून साधारण १३८० फुटांपर्यंत असल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच या ब्लू होलमध्ये अनेक गुहा आणि मनुष्यांनी आजवर न पाहिलेल्या जीवांचा समावेश असण्याची शंका अभ्यासकांकडून वर्तवण्यात आली आहे.

ब्लू होल तयार होण्याची कहाणी अतिशय रंजक

डिस्कव्हरीच्या माहितीनुसार, ब्लू होल या उभ्या सागरी गुहाच आहेत. ज्या हिमयुगादरम्यान, एखाद्या हिमनदीपासून तयार झालेल्या असू शकतात. हे महाकाय सिंक होल सहसा समुद्रतळाशी अतिशय खोलवर असतात, जिथे ऑक्सिजनची प्रचंड कमतरता असते. या खड्ड्यांमध्ये हायड्रोजन सल्फाइड वायू असून अनेक बॅक्टेरियाचा वावर असण्याची शक्यता असते. सध्या मेक्सिकोमधील हा ब्लू होल संपूर्ण जगाचं लक्ष वेधत असून या संदर्भातील पुढील निरीक्षणं अद्याप सुरु असल्याचे संशोधकांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -