Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेMumbai Local Crime : रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या युवकाला मोठा दिलासा

Mumbai Local Crime : रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या युवकाला मोठा दिलासा

शिवसेना शहर प्रमुखांनी केली आर्थिक मदत

कल्याण : ३ महिन्यापूर्वीच विवाह झाल्यानंतर कल्याण पूर्वेत स्थायिक होवून आपल्या परिवाराचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे स्वप्न पहाणारा जगन जंगले या ३२ वर्षीय युवकाला २२ मे रोजी रेल्वे अपघातात आपले दोन्हीही पाय गमवावे लागले आहेत. या युवकाची शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी तातडीने रुग्णालयात जावून भेट घेतली व त्याची विचारपूस करीत त्याला गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मदत केली.

या सोबत महेश गायकवाड यांच्या मध्यस्थीमुळे सदर रुग्णालयाने आजपर्यंत उपचारावर झालेला तसेच पुढेही होणारा सर्व खर्च माफ केला असून या युवकाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीही तातडीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. महेश गायकवाड यांच्या या मदतीमुळे जंगले कुटंबियांवर कोसळलेल्या या संकटातून उभे राहण्यास मदत मिळाली असल्याने जंगले कुटुंबियानी महेश गायकवाड यांचे आभार मानले आहेत.

नेमकं घडलं काय?

या वर्षीच्या फेब्रवारी २०२४ मध्ये विवाह झालेला जगन जंगले हा बत्तीस वर्षीय युवक दादर येथील मॅजेस्टिक या पुस्तक विक्रीच्या दुकानात नोकरी करत होता. या निमित्ताने दादर ते कल्याण असा त्यांचा दररोजचा लोकल प्रवास होता. २२ मे रोजी दादरहून कल्याणसाठी प्रवास करत असताना आणि लोकलमध्ये गर्दी असल्याने त्यांना लोकलच्या दारातच उभे राहून प्रवास करीत असताना त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याच्या उद्देशाने ठाणे ते कळवा दरम्याच त्यांच्या हातावर अज्ञात इसमाने लाकडी दांडीचा फटका मारला. या घटनेत जगनचा तोल जाऊन तो चालत्या लोकल मधून खाली पडला असता या अपघातात त्यांचे दोन्ही पाय लोकल खाली येऊन कापले गेले. त्यालाउपचारार्थ ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले मात्र त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. लोकल रेल्वे प्रशासनाकडून काय मदत होते.‌ केंदसरकार काय मदत करते. लोकल रेल्वे मधून प्रवास म्हणजे एक जोखीम झेलून जाणं आहे आणि याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे.

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -