Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीMajalgaon Nagarparishad burnt : मराठा आंदोलकांनी माजलगाव नगरपरिषद पेटवली!

Majalgaon Nagarparishad burnt : मराठा आंदोलकांनी माजलगाव नगरपरिषद पेटवली!

आमदारांच्या घरानंतर आता बीडमधील नगरपरिषदेतून आगीचे लोट

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी आज सकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत आग लावली. यानंतर आता दुपारी बीडमध्येच माजलगाव येथील नगरपरिषद कार्यालय पेटवून दिले आहे. आरक्षणाची मागणी करत आलेल्या जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये घुसून जाळपोळ सुरू केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागली आहे.

आमदारांच्या घरी जाळपोळ केल्यानंतर तेच आंदोलक आरक्षणाची मागणी करत नगरपरिषदेपर्यंत पोहोचले. नगरपरिषदेच्या आगीची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या माजलगाव परिसरात तणावाचे वातावरण आहे.

बीड जिल्ह्यामध्ये परळी-बीड त्यासोबतच धुळे-सोलापूर आणि त्यानंतर आता कल्याण विशाखापटनम महामार्गावर सुद्धा आंदोलन करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कल्याण विशाखापटनम महामार्गावर तालखेड फाटा येथे मराठा समाजाच्या आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एकीकडे मराठा आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात अशी चर्चा होत असतानाच, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ते प्रचंड आक्रमक होऊ शकतात, हे दाखवायला त्यांनी सुरुवात केली आहे. लागोपाठ जाळपोळीच्या घटना वाढत चालल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -