Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीManoj Jarange Patil : उठताना जरांगे कोसळले; प्रकृती ढासळली!

Manoj Jarange Patil : उठताना जरांगे कोसळले; प्रकृती ढासळली!

जरांगेंनी पाणी प्यावं म्हणून ग्रामस्थ आक्रमक

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आज उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळली आहे. यावेळेस पाण्याचाही त्यांनी त्याग केला आहे. दोन वेळा विशेष विनंतीवरुन त्यांनी पाण्याचा फक्त घोट घेतला आहे. शिवाय ते डॉक्टरांना उपचारही करु देत नाही आहेत, त्यामुळे जरांगेंना बोलण्यातही अडचणी येत आहेत. आज माध्यमांशी संवाद साधण्यासाठी उठत असताना ते जागेवर कोसळले. आधार देऊन त्यांना बसवण्यात आलं. यामुळे त्यांनी पाणी प्यायलंच पाहिजे यासाठी तेथे उपस्थित असलेले मराठा बांधव आक्रमक झाले होते.

उपोषणस्थळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सातत्याने त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे यांना उपचारांची खूपच गरज आहे. पाच ते सहा दिवस झाले त्यांच्या पोटात पाणीदेखील नाही. त्यामुळे डिहायड्रेशन खूप झालं आहे. त्यांना खूपच वीकनेस आला आहे. बीपी आणि शुगरही कमी झाले असल्याची शक्यता आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर त्यांच्या लिव्हरवर आणि किडनीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, असं डॉक्टर म्हणाले.

डॉक्टर्स जरांगेंना तासातासाला पाणी पिण्याची विनंती करत आहेत, मात्र आरक्षण हाच माझ्यावरचा एकमेव उपचार आहे, असं जरांगे म्हणाले. जरांगे यांची प्रकृती ढासळत चालल्याने अनेक जिल्ह्यांमधून मराठा आंदोलनाचे समर्थक आंतरवालीत दाखल होत आहेत. अनेक आंदोलक आक्रोशही करत आहेत. पण जोपर्यंत माझ्या तोंडून शब्द निघत आहेत तोपर्यंत चर्चेसाठी या, असं आवाहनही जरांगे यांनी सरकारला केलं आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर जरांगेंना उठणं शक्य न झाल्याने त्यांनी पाणी प्यावं यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. जरांगेंनी पाणी प्यायलंच पाहिजे, अशा हट्टाला ते पेटले होते. त्यांच्या विनंतीचा मान राखून जरांगे तीन ते चार घोट पाणी पिण्यासाठी तयार झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -