Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीJoining Shivsena : वर्धापन दिनाअगोदर ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के

Joining Shivsena : वर्धापन दिनाअगोदर ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के

मनिषा कायंदेंसह आणखी तीन जणांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन (Shivsena Anniversary) उद्यावर येऊन ठेपला असतानाही ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. ठाकरे गटातील (Thackeray gat) अनेक नेते पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आधीच्या शिवसेनेत बंड करुन वेगळा गट स्थापन केल्यापासून हे पर्व सुरुच आहे. मात्र शिवसेनेतून कोणीही ठाकरे गटात परतलेले नाही. यात आता वर्धापन दिनादिवशीच विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी संपर्क होत नाही आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे.

ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. मूळच्या शिक्षिका असणार्‍या मनिषा कायदेंनी २०१२ साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला व एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही त्यांनी ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडली. ठाकरे गटाच्या महिला नेत्यांमध्ये नाराजी असतानादेखील त्यांना उद्धव ठाकरेंकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता त्याच पक्ष सोडून जात असल्याने ठाकरे गट आणखी कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे.

शिशिर शिंदे व तांडेल पती पत्नीचाही राजीनामा

ठाकरे गटाचं उपनेतेपद सांभाळणा-या शिशिर शिंदेंनी देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे काल आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच चुनाभट्टी येथील नगरसेवक असणार्‍या स्वाती तांडेल व विजय तांडेल या जोडप्याने देखील ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे व ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -