Wednesday, June 26, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023IND vs SA: आज ईडन गार्डनवर भारताची दक्षिण आफ्रिकेशी टक्कर

IND vs SA: आज ईडन गार्डनवर भारताची दक्षिण आफ्रिकेशी टक्कर

कोलकाता: विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) आज ५ नोव्हेंबरला टीम इंडियाचा(team india) मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी (south africa) होत आहे.हा सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत या मैदानावर आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्हीही सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व अधिक राहिले आहे. वेगवान गोलंदाज आणि स्पिनर्स दोघांनाही या पिचवर मदत मिळाली आहे. आजच्या सामन्यातही अशाच पद्धतीने पिच राहणार आहे.

आयपीएलच्या सामन्यांमध्ये येथे धावांचा पाऊस पाहायला मिळतो मात्र विश्वचषकातील गेल्या दोन सामन्यात पिचने गोलंदाजांना साथ दिली आहे. या दोन्ही सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ २३०चा आकडाही गाठू शकलेला नाही. येथे वेगवान गोलंदाज विकेट घेण्यात पुढे आहे तर स्पिनर्सचा इकॉनॉमी रेट जबरदस्त आहे. गेल्या सामन्यात येथे रात्रीच्या वेळेस दवही दिसला होता. यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे झाले होते. आजही पिच गोलंदाजांना साथ देईल असे चित्र आहे. दरम्यान, फलंदाजांकडेही संधी आहे.

कसे आहेत मैदानातील आकडे?

वनडे क्रिकेटच्या या मैदानावर गोलंदाजी तसेच फलंदाजीही बहरली आहे. कधी कधी येते गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले तर कधी कधी फलंदाजांनी हे मैदान गाजवले. येथे झालेल्या ३३ सामन्यात ८ वेळा ३००हून धावसंख्या बनली आहे. येथे एकदा ४००हून अधिक धावसंख्याही झाली आहे. दरम्यान, २१ वेळा असे झाले की येथे संघाला २००चा आकडाही गाठता आला नाही.

या मैदानावर गेल्या ९ सामन्यात ७ वेळा फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. दरम्यान, आज रात्री येथे दव पडण्याची शक्यता असल्याने पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळण्याची शक्यता अधिक आहे.

भारतीय संघाने येथे एकूण २२ सामने खेळले आहेत. यात १३ मध्ये विजय तर ८मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक सामना अनिर्णीत राहिला. दक्षिण आफ्रिकेचाही रेकॉर्ड या ठिकाणी ठीक-ठाक आहे. आफ्रिकेने या मैदानावर ४ सामने खेळले आहेत. यात २ सामन्यात त्यांना विजय तर २ सामन्यांत पराभव पत्करावा लागला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -