Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023Happy Birthday Virat Kohli: 'रन मशीन' कोहलीच्या नावावर मोठमोठे रेकॉर्ड, बर्थडेच्या दिवशी...

Happy Birthday Virat Kohli: ‘रन मशीन’ कोहलीच्या नावावर मोठमोठे रेकॉर्ड, बर्थडेच्या दिवशी इतिहास रचण्याची संधी

मुंबई: भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेसोबत सामना खेळत आहे. भारत(india) आणि दक्षिण आफ्रिका(south africa) यांच्यात विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) ३७वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जात आहे. हा सामना विराट कोहलीसाठी(virat kohli) खास आहे. कोहली आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सामना खेळत आहे. तो ३५ वर्षांचा झाला आहे. विराटने आपल्या करिअरदरम्यान अनेक जबरदस्त खेळी केल्या आहेत. यासोबतच अनेक रेकॉर्डही केले आहेत. त्याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी इतिहास रचण्याची संधी आहे.

विराटने वनडेमध्ये आतापर्यंत ४८ शतके ठोकली आहे. या फॉरमॅटमध्ये तो सर्वाधिक शतक ठोकण्याच्या बाबती सचिन तेंडुलकरची बरोबरी करू शकतो. कोहलीला यासाठी एका शतकाची आवश्यकता आहे. सचिनने ४९ वनडे शतक ठोकले आहेत. तर विराटने २८८ वनडे सामन्यात ४८ शतके ठोकली आहेत. कोहली आपल्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना नक्कीच गिफ्ट देऊ शकतो. यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागेल. द. आफ्रिकेचा संघ फॉर्मात आहे आणि त्यांचे गोलंदाज कोणत्याही परिस्थितीत कोहलीला रोखण्याचा प्रयत्न जरूर करतील.

विराटने भारतासाठी अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २८८ वनडे सामन्यात १३५३५ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २९ शतके आणि २९ अर्धशतके ठोकली आहेत. यासोबतच त्याने ७ वेळा दुहेरी शतक ठोरले आहे. विराटने ११५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४००८ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये एक शतक आणि ३७ अर्धशतके ठोकली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -