Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीHurricane: मेक्सिकोत ओटिस वादळाचे थैमान

Hurricane: मेक्सिकोत ओटिस वादळाचे थैमान

मेक्सिको: पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरील मेक्सिकोसाठी कालचा बुधवारचा दिवस अतिशय भयानक ठरला. ओटिस हे वादळ(hurricane) २३० किमी प्रति तास या गतीने मेक्सिकोच्या किनाऱ्याला धडकले. वेगवान वारे आणि मुसळधार पावसाने मेक्सिकोच्या किनाऱ्यावरील भागांना मोठा तडाखा बसला. हे वादळ इतके वेगवान होते की लोकांची घरे, घराच्या बाहेरील गाड्या तसेच विजांचे खांब, झाडे आणि मोबाईल टॉवरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वादळ इतके वेगवान होते की यावर नियंत्रण मिळवणे अतिशय कठीण झाले. मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की इतके तुफानी वादळ १९५० नंतर पहिल्यांदा आल होते. या वादळाने सारेच रेकॉर्ड तोडले. या वादळापासून बचावाची संधीच मिळाली नाही. कारण ज्या ठिकाणी हे वादळ उठले त्याच्या १२ तासांच्या आत हे किनाऱ्याला धडकले.

वादळाची स्थिती

मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या वादळामुळे किती प्रमाणात जिवितहानी झाली हे अद्याप समजलेले नाही. कारण याचा वेग ४५ किमी प्रति तास आहे.. गेल्या १२ तासांत याचा वेग साधारण २१५ किमी ते १३० किमी झाला आहे. मात्र या सगळ्यात बाकी जागांचे खूप नुकसान झाले आहे.

१० लाखाहून अधिक लोकांना फटका?

अकापुल्को येथे ओटिस वादळाने किनाऱ्याला धडक दिली तेथे साधारण दहा लाख लोक राहतात. हा मेक्सिकोतील सगळ्यात मोठा टूरिस्ट स्पॉट आहे. मात्र ओटिस वादळामुळे हे ठिकाण पूर्णपणे नष्ट झाले आहे. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांच्या मते पॅसिफिक महासागराचे पाणी गरम झाल्यामुळे हे वादळ आले. त्यांच्या मते हे वादळ ग्लोबल वॉर्मिंगमुळे आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -