Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीहोळी, धुळवडीनंतर कोकणात पोस्त्याची धूम

होळी, धुळवडीनंतर कोकणात पोस्त्याची धूम

रोहा : होळीच्या दुस-या दिवशी म्हणजेच धुळवडीच्या दिवशी कोकणात पोस्ता नावाचा सण साजरा करण्यात येतो. यंदा धुळवड शुक्रवारी आल्याने हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणासाठी शहरी आणि ग्रामीण भागात मटण आणि दारूचा बेत असतो. शुक्रवारी यानिमित्ताने सर्वत्र मटणावळी झोडल्या गेल्या.

ग्रामीण भागात महत्त्वाचा असलेल्या या सणाची तयारी आदल्या दिवशीपासूनच सुरू झाली होती. या सणासाठी हजारो मेंढरांची कत्तल करण्यात आली. बहुतांशी ठिकाणी होळी पेटवल्यानंतर रात्रीपासूनच ग्रामस्थ एकत्र येऊन होळीच्या शेजारीच पोस्त्याचे मटण शिजवतात. गुरुवारी रात्रीपासून या सणाची तयारी करण्यात आली होती.

या सणासाठी बोकडाऐवजी मेंढराच्या मटणाला जास्त पसंती दिली जाते. हा सण कुठे वर्गणी काढून, तर कुठे गावकी, भावकीच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. तसेच काही ठिकाणी शिजवलेले, तर काही ठिकाणी कच्चे मटण वाटले जाते. मटणाचे वाटप ही या सणाची खरी कला असते. पोस्त्याचे मटण घेण्यासाठी ग्रामस्थ भांडी घेऊन वेळेत आणि रांगेत हजर असतात. शिजविलेल्या मटणाचे समान हिस्से करून होणारे पानांचे वाटप म्हणजे मोटी कसरत असते. मात्र वर्षानुवर्षाच्या अनुभवातून आणी जुन्या-जाणत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कासर्यक्रम साजरा करण्यात येतो.

रोहा शहरातील अष्टमी मराठा आळीमध्ये मागील ५० वर्षापेक्षा जास्त काळापासून हा सण नियमितपणे साजरा होत आहे. तर तालुक्यातील मेढा, हेटवणे, किल्ला, अशोक नगर, निवी, खारी, धाटाव आदी गावांसह शहरातील मोरे आळी, अंधार आळी, अष्टमी, दमखाडी, महात्मा फुले नगर आदी भागांत पोस्त्याचे कार्यक्रम होतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -