Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनमुंबईत मनसेकडून 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे तिकीट मोफत वाटप

मुंबईत मनसेकडून ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे तिकीट मोफत वाटप

मुंबई – दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा द काश्मीर फाईल्स चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर १५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटामुळे वादही निर्माण झाले आहेत. द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कौतूक केले. त्यानंतर, भाजप नेत्यांनी, भाजपशासित राज्यांनी या चित्रपटाला प्रमोट केले. काहींनी हा चित्रपट टॅक्स फ्री केला. त्यामुळे, या चित्रपटाबद्दल अनेकांची उत्सुकता वाढली. आता, मनसेनं हा चित्रपट फुकट दाखवण्यास सुरुवात केली आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. माहिम विधानसभा आयोजित हा चित्रपटाचा खास शो ठेवण्यात आला आहे. 24 मार्च रोजी सायंकाळी 7.15 वाजता एल.जे. रोडवरील सिटी लाईट सिनेमागृहात हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तसेच, तिकीट मिळविण्यासाठी संपर्क करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. विशेष म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, असेही त्यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -