Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीGarlic: लसूण खाल्ल्याने वाढेल तुमचे आयुष्य, मात्र अशा पद्धतीने करा सेवन

Garlic: लसूण खाल्ल्याने वाढेल तुमचे आयुष्य, मात्र अशा पद्धतीने करा सेवन

मुंबई: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी माणसाला ८ ते ८ तासांची झोप गरजेची असते. झोप पूर्ण न झाल्यास अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्या झोपेवरही परिणाम होत आहे.

अनेक लोक असे आहेत ज्यांना बेडवर पडल्यानंतरही झोप येत नाही. जर झोप आलीच तरी सतत जाग येत असते. यामुळे सकाळी उठल्यावर त्यांना एनर्जेटिक वाटत नाही.

झोपेची समस्या दूर करण्यासाठी लोक नानाविध प्रयोग करत असतात. अशीच एक पद्धत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे की रात्री झोपण्याआधी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्याने गाढ झोप येते.

असे म्हटले जात आहे की सलग २१ दिवसांपर्यंत रात्री झोपण्याआधी लसूण खाल्ल्याने चांगल्या झोपेसोबत शरीरास अनेक फायदे मिळतात.

आरोग्य तज्ञांच्या मते लसूण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आम्ही तुम्हाला आज लसूण खाण्याच्या फायद्याबद्दल सांगत आहोत.

लसणीमध्ये एलीसिन नावाचे एजंट असते जे नियमितपणे खाल्ल्याने प्रत्येक प्रकारच्या संक्रमणापासून सुरक्षा मिळते. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

लसणीमध्ये सल्फर कंपाऊंड्स आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्याच्या सेवनाने लिपिड प्रोफाईल सुधारते आणि हाय ब्लड प्रेशर सामान्य होते ज्यामुळे आपले हृदय निरोगी राहते.

लसणीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात.यामुळे शरीर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचते. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने वाढत्या वयाचा वेग कमी करता येतो.

दरम्यान, कच्चा लसूण खाण्याचे काही नुकसानही आहेत. यामुळे मळमळणे, गॅससारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे दररोज एक लसणाची कळी खायला सुरूवात करा.

जे लोक विशिष्ट औषधे घेत असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लसूण खाल्ली नाही पाहिजे. जर तुम्हाला कच्चा लसूण खायचा नसेल तर डाळ, भाजीमध्ये लसणीचा वापर करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -