Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीAir India: एअर इंडियाच्या पायलटचा अजब कारनामा, विमानाच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसवलं

Air India: एअर इंडियाच्या पायलटचा अजब कारनामा, विमानाच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसवलं

चंदीगढ: एअर इंडियाच्या पायलटने विमानाच्या कॉकपिटमध्ये चक्क मैत्रिणीला बसवलं. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या पायलटवर कारवाई करत त्याचा परवाना एक वर्षासाठी रद्द केला आहे. या पायलटने अधिकारांचा गैरवापर आणि नियमांचं उल्लंघन करत प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली होती.

एअर इंडियाच्या चंदीगढ-लेह विमानामधील ३ जून रोजी ही घटना घडली. चंदीगड-लेह फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी पायलटचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली. याशिवाय, याप्रकरणाबाबत माहिती न दिल्यामुळे विमानाच्या सह-वैमानिकावरही कारवाई करण्यात आली आहे. डीजीएसएने त्याच फ्लाइटच्या सह-वैमानिकाचा परवाना एका महिन्यासाठी रद्द केला आहे. ३ जून रोजी घडलेल्या घटनेनंतर दोन्ही वैमानिकांना चौकशी होईपर्यंत सेवेतून काढून टाकण्याचे आदेश याआधी जारी करण्यात आले होते.

डीजीसीएनं काय म्हटलं?

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) सुरक्षा नियमांनुसार, अनधिकृत व्यक्तींना कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही आणि हे नियमांचं उल्लंघन आहे. “मेसर्स एअर इंडिया फ्लाइट AI-458 (चंदीगड-लेह) च्या पायलट-इन-कमांडने ३ जून रोजी एका अनधिकृत व्यक्तीला कॉकपिटमध्ये प्रवेश दिला आणि ती व्यक्ती संपूर्ण फ्लाइट दरम्यान कॉकपिटमध्येच उपस्थित होती.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -