Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीTitan submersible: टायटानिकचा शोध घ्यायला गेलेली ती पाणबुडी सापडली पण...

Titan submersible: टायटानिकचा शोध घ्यायला गेलेली ती पाणबुडी सापडली पण…

वृत्तसंस्था: टायटॅनिकच्या जहाजाच्या अवशेषांपासून सुमारे १ हजार ६०० फूट अंतरावर समुद्राच्या तळावर बेपत्ता पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषांनुसार, प्रेशर चेंबरमध्ये स्फोट झाल्याचं सांगितलं जात असून या बाबत अधिकृत माहिती तपासानंतर समोर येईल. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, टायटन पाणबुडीचा स्फोट नेमका कधी झाला हे सांगणे सध्या कठीण आहे. यूएस कोस्ट गार्डचे रिअर अॅडमिरल जॉन मॅगर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

अपघातग्रस्त टायटन पाणबुडीमध्ये ओशनगेट एक्स्पिडिशन्सचे संस्थापक आणि सीईओ स्टॉकटन रश, ब्रिटिश अब्जाधीश हॅमिश हार्डिंग, प्रसिद्ध फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट, पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद आणि त्यांचा १९ वर्षांचा मुलगा सुलेमान हे पाच जण होते. याचा मृत्यू झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार, समोर येत आहे.

सुलेमान या मोहिमेसाठी तयार नव्हता

दरम्यान, पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद यांचा मुलगा या मोहिमेआधीच घाबरलेला होता, असा खुलासा त्याच्या मावशीने केला आहे. आझमेह दाऊदने NBC न्यूजला सांगितलं की, सुलेमान पूर्णपणे घाबरला होता आणि त्याच्या टायटॅनिक प्रेमी वडिलांसाठी ही मोहिम महत्त्वाची असल्यामुळे तो मोहिमेवर जाण्यास तयार झाला होता, तो यासाठी फारसा तयार नव्हता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -