Thursday, May 9, 2024
Homeमहत्वाची बातमीया देशात वेगाने पसरतोय कोरोना, लोकांना इशारा, भारताला धोका?

या देशात वेगाने पसरतोय कोरोना, लोकांना इशारा, भारताला धोका?

सिंगापूर: भारतासह अनेक देशांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. अशातच जगासाठी सगळ्यात मोठा धोकादायक असलेला कोरोनाचा आजार पुन्हा आपले डोके वर काढत आहे. सिंगापूरमध्ये डॉक्टर्संनी वेगाने वाढत्या कोविड १९ पाहता लोकांना लसीकरण करण्यास तसेच मास्क घालण्यावर जोर दिला आहे.

सिंगापूरमध्ये कोविड १९, इन्फ्लुएंजा आणि सामान्य सर्दीसह श्वसनाचे आजार वाढत आहेत. द स्ट्रेटस टाईम्सच्या मंगळवारच्या एका रिपोर्टनुसार १२०हून अधिक क्लिनिकांची सर्वात मोठी सीरिज हेल्थवे मेडिकल आणि ५५ जीबी क्लीनिक असलेल्या पार्कवे शेंटनचे म्हणणे आहे की त्यांनी श्वसनाच्या आजारांमध्ये ३० टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले की, ४३ जीपी क्लिनिक असलेल्या रॅफल्स मेडिकलमध्येही असेच प्रकारचे आजार पाहायला मिळत आहेत. सिंगापूरच्या २५ पॉलिक्लिनिकमध्ये दररोज २९७० प्रकरणे समोर येत आहेत. वर्षाच्या या कालावधीत २०१८ ते २०२२ पर्यंत पाच वर्षांच्या सरासरीने दरदिवशी २००९ प्रकरणे होती. दरम्यान, या महामारीच्या पहिल्या वर्षात दर दिवसाला ३ हजार ते ३५०० प्रकरणे समोर येत होती. कोरोनाबाबत सजगता बाळगल्याने हे प्रमाण गेल्या तीन वर्षात कमी झाले होते.

२०२० आणि २०२१मध्ये डिसेंबरच्या सुरूवातीला पॉलिक्लिनिकमध्ये एका दिवसाला १०००हून कमी प्रकरणे पाहायला मिळाली होती. पॉलिक्लिनिक्समध्ये प्रायमरी केअर सेटिंगमध्ये साधारण २० चक्के गंभीर प्रकरणांवर इलाज केला जातो. तर १८००जीपी क्लिनिक बाकी केसेस सांभाळतात. त्याच आठवड्यात ३२ हजाराहून अधिक लोकांवर कोरोनाचे उपचार करण्यात आले. साधारण ४६०जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील ९ जण गंभीर स्थितीत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -