Friday, May 10, 2024
Homeक्रीडाबुमराहला आयसीसीकडून मिळाले ‘खास’ गिफ्ट

बुमराहला आयसीसीकडून मिळाले ‘खास’ गिफ्ट

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नुकताच क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. आयपीएलनंतर, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचा भाग नाही.

दरम्यान, त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये बुमराहने हातात लाल टोपी घेतली आहे. ही कॅप दशकातील आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय संघाची आहे. आयसीसीने २०२० मध्ये सर्व फॉरमॅटमधील टीम ऑफ द डिकेडची घोषणा केली होती. टी-२० मध्ये भारताचे चार खेळाडू निवडण्यात आले होते.

यात जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश होता. या संघाचा कर्णधार म्हणून धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. जवळपास १८ महिन्यांनी आयसीसीने बुमराहला या संघाची कॅप पाठवून दिली आहे. या कॅपचा फोटो शेअर करत बुमराहने ‘या सन्मानासाठी धन्यवाद आयसीसी’ असे कॅप्शनही दिले.

जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये भारतासाठी टी-२० पदार्पण केले होते, त्याचा या फॉरमॅटमध्ये एक आश्चर्यकारक रेकॉर्ड आहे. त्याने आतापर्यंत ५७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने केवळ ६.५१ च्या सरासरीने धावा देऊन ६७ बळी घेतले आहेत. बुमराहने शेवटचा टी-२० सामना फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -