Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीASEAN-India Summit : पंतप्रधान मोदी आसियान समिटमध्ये सहभागी, एक पृथ्वी, एक कुटुंब,...

ASEAN-India Summit : पंतप्रधान मोदी आसियान समिटमध्ये सहभागी, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा आपला मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान-भारत शिखर परिषदेला उपस्थित

जकार्ता : एकवीसावे शतक हे आशियाचे शतक आहे; एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा आपला मंत्र आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी इंडोनेशियातील जकार्ता येथे विसाव्या आसियान शिखर परिषदेमध्ये (ASEAN-India Summit) केले. पीएम मोदींसोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही आसियान शिखर परिषदेला उपस्थित होते.

शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडोनेशिया आणि आमची (भारत) भागीदारी चौथ्या दशकात पोहोचली आहे. या शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल मी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे अभिनंदन करतो. गेल्या वर्षी आम्ही भारत-आसियान मैत्री दिन साजरा केला होता. आता त्याचे रूपांतर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत झाले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ही परिषद आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपला इतिहास आणि भूगोल भारत आणि आसियानला एकत्र करतो. यासोबतच सामायिक मूल्ये, प्रादेशिक एकात्मता आणि शांतता, समृद्धी आणि बहु-ध्रुवीय यावर आमचा सामायिक विश्वास आहे. आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा मध्यवर्ती स्तंभ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसियान-भारत शिखर परिषदेला हजरी लावली. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी जकार्तामध्ये दाखल झाले. यावेळी इंडोनेशियन महिला सशक्तिकरण आणि बाल संरक्षण मंत्री आई गुस्ती आयु बिंटांग दारमावती यांनी मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी इंडोनेशियाचे सांस्कृतिक नृत्यही सादर करण्यात आले. यावेळी जमलेल्या भारतीयांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीयांना अभिवादन करत त्यांच्यासोबत संवाद साधला.

दरम्यान, नवी दिल्लीत जी-२० चे आयोजन असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी दिल्लीला परतणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -