Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीDahi handi : दहीहंडीवर पावसाची बरसात

Dahi handi : दहीहंडीवर पावसाची बरसात

राज्यभरातही पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई : कृष्णजन्माष्टमीनिमित्त (Krishna Janmashtami) आज मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी (Dahi handi) उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. मोकळ्या मैदानावर या दिवशी वेगवेगळ्या मंडळांकडून, पक्षांकडून दहीहंडी स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदाही या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आल्या असून त्याला पावसानेही सकाळपासूनच हजेरी लावली आहे. गेले अनेक दिवस दडी मारुन बसलेल्या पावसाने आज सकाळपासून मुंबईत चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे आता गोविंदांना रणरणत्या उन्हात दहीहंडीचे थर लावावे लागणार नाहीत.

पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस होत आहे. राज्यातील नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ठाण्यातील मानाची हंडी

ठाण्यातील (Thane) मानाची हंडी धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरु केली होती. आज मुसळधार पाऊस सुरु असताना त्या पावसाचा आनंद घेत गोविंदा पथकं या मानाच्या हंडीसाठी ठाण्यात दाखल झाली आहेत. पाऊस कोसळत असला तरी त्यांच्या उत्साह कुठेही कमी झालेला नसून या मानाच्या हंडीच्या ठिकाणी सलामी देणे हेच आम्ही मानाचं समजतो अशी भावना गोविंदा व्यक्त करत आहेत. याठिकाणी गोविंदांच्या दोन वेळच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

काल रात्रीपासूनच दहीहंडीचा उत्साह

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मुंबईमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रात्री बारा वाजता मुंबईतील अनेक भागात मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तरुणांनी अनेक थर रचत दहीहंडी फोडली आणि आनंद घेतला. मुंबईतील दादर, नायगाव, वरळी, लोअर परळ आणि मुंबईतील सर्वच परिसरात मोठ्या उत्साहाने दहीहंडी फोडून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. आजही मुंबई ठाण्यासह ठिकठिकाणी थरांचा थरार पाहायला मिळेल.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -