Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीअनन्या पांडेची तीन तासांहून अधिक काळ कसून चौकशी

अनन्या पांडेची तीन तासांहून अधिक काळ कसून चौकशी

एनसीबीचे मुंबईत दोन दिवसांत ६ ठिकाणी छापे; एक ड्रग पेडलर ताब्यात

मुंबई (प्रतिनिधी) : एनसीबीतर्फे गेल्या २ दिवसांत मुंबईतील ६ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा ‘एनसीबी’च्या टीमने २० ते २२ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले असून त्याला ‘एनसीबी’ कार्यालयात आणण्यात आले. हा मुलगा कोण आहे, याबाबत एनसीबीतर्फे कोणतीही माहिती देण्यात आली नसून सूत्रांनुसार, तो ड्रग पेडलर असल्याचे सांगितले जात आहे. हा ड्रग्ज पेडलर क्रूझ प्रकरणातील महत्त्वाचा संशयित असल्याचा दावा एनसीबीने केला आहे. त्यामुळं या ड्रग्ज पेडलरच्या चौकशीतून एनसीबीला आणखी माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, या ड्रग्ज पेडलरचे नाव व्हॉट्सअॅपवरील ड्रग्जसंबंधित चॅटमध्ये असल्याचा एनसीबीला संशय आहे. त्या अनुषंगाने एनसीबी तपास करत आहेत. दरम्यान, अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेची गुरुवारी एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर, शुक्रवारीही तिची दुसऱ्यांदा पुन्हा तीन तासांहून अधिक काळ कसून चौकशी करण्यात आली.

अनन्या आणि आर्यन हे संपर्कात होते, असे व्हॉट्सअॅप चॅटवरून स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांच्या चॅटमध्ये सांकेतिक शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळेच अनन्याही अमली पदार्थ दलालांच्या संपर्कात होती का, हे शोधले जात आहे. त्या दृष्टीनेच तिची चौकशी केली जात आहे, असे एनसीबीतील सूत्रांनी सांगितले.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अनन्याची चौकशी केली. त्यादरम्यान त्यांनी अनन्याला तिचे आणि आर्यनचे चॅटदेखील दाखवले. सूत्रांच्या माहितीनुसार, एका चॅटमध्ये आर्यन त्याची मैत्रीण अनन्याला विचारतोय की काही जुगाड होऊ शकते का, काही व्यवस्था होऊ शकते का? त्यावर अनन्या लिहिते की, मी काहीतरी व्यवस्था करते. असं म्हटले जातेय की आर्यन गांजा मिळवण्यासाठी अनन्याला विचारत होता. जेव्हा समीर यांनी अनन्याला या चॅटबद्दल प्रश्न विचारला तेव्हा अनन्या म्हणाली की, तो सिगारेटबद्दल विचारत होता. त्यानंतर समीर यांनी अनन्याला तू अमली पदार्थांचे सेवन केले आहेस का, असे विचारताच अनन्याने या गोष्टीला नकार दिला.

दरम्यान, एनसीबीच्या वांद्रे युनिटचे पथक अंधेरीच्या चार बंगला परिसरात गस्त घालत असताना जम्बो किड्सच्या बाजूला एक तरुण संशयास्पद हालचाल करताना नजरेस पडला. त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ १०० ग्रॅम एमडी मिळाले. चौकशीवेळी त्याने हा एमडी वर्सोवा येथे राहणारा अल्ताफ शेख याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शेखच्या घरावर धडक दिली. त्याच्याकडे ६० ग्रॅम एमडीचा साठा सापडला. पोलिसांनी अब्दुल्लाह शेख आणि अल्ताफ शेख या दोघांकडून १६० ग्रॅम एमडीचा साठा हस्तगत केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -