Friday, May 10, 2024
Homeदेशऍम्नेस्टी इंटरनॅशनलला ५२ कोटींचा दंड

ऍम्नेस्टी इंटरनॅशनलला ५२ कोटींचा दंड

फेमाच्या उल्लंघन प्रकरणी ईडीची कारवाई

नवी दिल्ली (हिं.स.) : परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याबद्दल ईडी न्यायिक प्राधिकरणाने ऍम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनलला ५१.७२ कोटी रुपये आणि कंपनीचे माजी सीईओ आकार पटेल यांना १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

फेमाचे उल्लंघन केल्याबद्दल प्राधिकरणाने कंपनी आणि माजी सीईओ पटेल यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. हे प्रकरण फेमाच्या उल्लंघनाशी संबंधित आहे. देशातील सामाजिक उपक्रमांच्या नावाखाली अॅम्नेस्टी इंटरनॅशनल यूकेकडून ५१.७२ कोटी रुपयांचे विदेशी योगदान मिळाले आहे. ईडीने फेमाच्या उल्लंघन प्रकरणी ऍम्नेस्टी इंडिया आणि कंपनीच्या माजी सीईओ दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

एका निवेदनात, ईडीच्या अधिकाऱ्याने म्हंटले की, नोव्हेंबर २०१३ ते जून २०१८ दरम्यान, आकार पटेलचे सीईओ म्हणून ऍम्नेस्टी इंडियाने विदेशी योगदानाचे उल्लंघन करून एफडीआयद्वारे ऍम्नेस्टी यूकेकडून ५२ निधी प्राप्त केल्याचा आरोप ईडीने केलाय. ईडी आणि सीबीआय २०१८ पासून पीएमएलए अंतर्गत त्याची सतत चौकशी करत होते.

ईडीच्या म्हणण्यानुसार, परदेशी लाभार्थीकडे परदेशी योगदानातून घेतलेल्या रकमेशिवाय काहीही नाही, ज्यामुळे फेमा तरतुदींचे उल्लंघन होत आहे. ईडीच्या न्यायिक प्राधिकरणाने असे मानले आहे की ऍम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनल ही ऍम्नेस्टी इंटरनॅशनल लिमिटेड यूके अंतर्गत एक भारतीय संस्था आहे, जी देशातील सामाजिक उपक्रमांसाठी स्थापन करण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -