Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीAir service : विदर्भ ते मराठवाडा एका तासात! लवकरच सुरु होणार विमानसेवा

Air service : विदर्भ ते मराठवाडा एका तासात! लवकरच सुरु होणार विमानसेवा

कसं असणार वेळापत्रक?

विदर्भ ते मराठवाडा (Vidarbha to Marathwada) प्रवास करणार्‍यांसाठी एक खुशखबर आहे. विदर्भ ते मराठवाडा हे अनेक तासांचं अंतर आता काही मिनिटांत पार करता येणार आहे. लवकरच या ठिकाणांदरम्यान विमानसेवा (Flights From Nagpur To Chhatrapati Sambhajinagar) सुरु होणार आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नागपूर (Nagpur) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) ही विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशातील अतिशय महत्वाची आर्थिक केंद्रं आहेत. या दोन्ही शहरांदरम्यान रोज मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. मात्र, नागपूर ते छत्रपती संभाजीनगर अशी थेट रेल्वेसेवा नाही. थोड्या रेल्वे छत्रपती संभाजीनगर येथे थांबतात. या प्रवासात खासगी ट्रॅव्हल्सपेक्षाही जास्त वेळ जातो. त्यामुळे असा प्रवास करणं जास्त कठीण आणि वेळखाऊ होतो.

तर दुसरीकडे या कारणामुळे नागपूर ते छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी ट्रॅव्हल्सचा उपयोग होत असल्याचं दिसतं. मोठ्या प्रमाणात प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सने रात्रीच्या वेळी प्रवास करताना दिसतात. परंतु या प्रवासामध्ये किमान बारा आणि किंवा त्यापेक्षाही जास्त तास लागतात. मात्र, आता विमानसेवा सुरु होत असल्याने या सर्व समस्या सुटणार आहेत. नांदेड ते नागपूर ५० मिनिटं आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर प्रवास केवळ अवघ्या १ तासात पूर्ण होणार आहे.

कसं असणार वेळापत्रक?

नागपूर ते नांदेड यांदरम्यान २७ जूनपासून स्टार एअरची सेवा सुरू होणार (Nagpur Marathwada Airline) आहे. ही विमानसेवा सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार अशी आठवड्यातील चार दिवस असणार आहे. तेच नागपूर ते छत्रपती संभाजीनगर इंडिगो एअरलाईन्स विमानसेवा २ जुलैपासून सुरू होणार आहे. ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे आठवड्यातील तीन दिवस असणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शहरांदरम्यान विमानसेवा सुरू होत असल्यामुळे हे दोन प्रदेश अधिक जवळ येत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -