Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीअदाणी इलेक्ट्रिसिटीचे इमारतींमध्ये ईव्हीसाठी 'शेअर चार्ज'

अदाणी इलेक्ट्रिसिटीचे इमारतींमध्ये ईव्हीसाठी ‘शेअर चार्ज’

मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग सहजपणे करता यावे यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने गृहनिर्माण संस्थांसाठी शेअर चार्जिंग उपक्रम सुरू केला असूनयात उपनगरांमधील चार हजार सोसायट्यांमध्ये साडेआठ हजार चार्जर लावले जातील.

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असताना वाहनमालकांना चार्जिंगची व्यवस्था सहजपणे मिळावी यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीचा हा उपक्रम असून त्यामुळे सहजपणे स्वस्तात आणि पर्यावरणपूरक अशी चार्जिंग यंत्रणा नागरिकांना मिळू शकेल. इमारतींमध्ये इलेक्ट्रिक चार्जर लावण्याचे काम अदाणीतर्फे सुरु करण्यात आले आहे.

वैशिष्ठ्ये

१. या पद्धतीत वेगवेगळ्या चार्जरची किंवा वायरच्या जंजाळाची गरज नसते. ए. आर. ए. आय. ने प्रमाणित केलेले शेअर चार्जर स्टेशन इमारतींच्या आवारात उभारले जाईल. त्यामुळे वाहनांना चार्जिंगसाठी जागाही जास्त मिळेल आणि वेगवेगळे चार्जर स्वतः लावत बसण्याचा त्रास कमी होईल.

२. तेथे वाहने चार्जिंगला कधी आणावीत, कोणी किती वेळ चार्जिंग केले व त्याचे बिल किती झाले ते ठरवून त्याचे पैसे देणे ही व्यवस्था देखील अॅपमार्फत केली जाईल.

३. हे चार्जिंग अत्यंत स्वस्त दरात होणार असल्यामुळे वाहनचालकांचे पैसेहीवाचतील. तसेच यामुळे या सोयीसाठी प्रयत्न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचात्रासही वाचेल. तसेच ही व्यवस्था पर्यावरणपूरक असल्याने प्रदूषणही होणार नाही.

हे शेअर चार्जिंग अत्यंत सोयीस्कर, स्वस्त तसेच आगळेवेगळे आहे. यामुळेही सुविधा उभारण्याचा सोसायट्यांचा त्रास वाचेल, साध्या वाहनांकडून इलेक्ट्रिक वाहनांकडे जाण्याचा सोसायट्यांचा प्रवास आम्ही सोपा करू. शेअर चार्ज हे त्याचेच उदाहरण असून त्याने कमी त्रासात व कमी खर्चात ही सुविधा मिळेल, असे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.

वेगवान चार्जिंग

  • या चार्जरद्वारे सामान्य चारचाकींसाठी पूर्ण चार्जिंग करण्यास साधारण सात तास लागतात. तर दुचाकींसाठी साधारण चार तास लागतात.
  • एका चार्जरवर अनेक गाड्यांचे चार्जिग होऊ शकते.
  • ही व्यवस्था मुंबईत सर्वात स्वस्त दरात मिळेल.

वापरकर्त्यांचे अनुभव

आमच्या सोसायटीत शेअर चार्जिंग स्टेशन उभारण्याची कल्पना खूपच चांगली ठरली. ते अत्यंत सोईस्कर असून त्याचा रहीवाशांना मोठा फायदा झाला, असे बोरिवलीच्या सिद्धार्थ नगर येथील धीरज सवेरा टॉवर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सेक्रेटरी एम. गौतमन म्हणाले.
 
तर या व्यवस्थेमुळे माझे पैसेही वाचले आणि प्रदूषण कमी करण्यासही माझ्याकडून हातभार लागला, असे अंधेरीच्या शास्त्रीनगर येथील रुणवाल एलिजंट सहकारी गृहनिर्माण संस्थेचे रहिवासी अमित मूलचंदानी म्हणाले.

सोसायट्यांसाठी अधिक माहितीसाठी संपर्क (टोल फ्री) १९१२२ किंवा वेबसाईट https://www.adanielectricity.com/sharecharge येथे संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -