Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीआचारसंहिते दरम्यान देखील गरजू रुग्णांना मिळणार अर्थसहाय्य

आचारसंहिते दरम्यान देखील गरजू रुग्णांना मिळणार अर्थसहाय्य

राज्यातील एकही रूग्ण रूग्णसेवेपासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अखंडपणे सुरूच राहणार – मंगेश चिवटे

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. परंतू या आचारसंहितेमुळे दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णाना मदत मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी जाहीर केले आहे.

गोरगरीब रुग्ण त्यांच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीकडे मदत मागण्यासाठी जात असतात. त्यांनी आम्हाला अर्ज पाठवावे. फक्त आचारसंहितेमध्ये लोकप्रतिनिधी यांस त्यांचे शिफारस पत्र (लेटर हेड) देण्यासाठी निर्बंध असतात. त्यामुळे रुग्णाने किंवा नातेवाईकांनी स्वतः अर्ज ऑनलाइन पाठवला किंवा मंत्रालयात जमा केला तरी आपण मदत देणार आहोत. या मदतीमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू देणार नाही, असे ते म्हणाले.

२५,८७४ रुग्णांचे वाचले प्राण! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -