Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजसख्खा भाऊ पक्का वैरी

सख्खा भाऊ पक्का वैरी

अॅड. रिया करंजकर

नकुल कामामध्ये व्यस्त होता. दुपारचे दोन वाजले असतील, एवढ्यात त्याच्या फोनवर त्याच्या पत्नीचा म्हणजेच रेखाचा फोन खणखणला. त्याने तो घाईघाईतच घेतला, कारण रेखा आठ महिन्यांची गरोदर होती. काय झाले असेल, या विचाराने त्याने तो लगेच उचलला. तिने रडत-रडत सुरुवात केली. नकुलच्या हृदयाचे ठोके चुकले. थोडा वेळ डोके सुन्न झाले. आपली पत्नी काय बोलते हे त्याला समजत नव्हतं म्हणून तो अर्धा दिवस सुट्टी घेऊन घरी निघाला. कल्याणला येईपर्यंत त्याला उशीर झाला. बिल्डिंगमध्ये आल्यानंतर शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून झालेल्या गोष्टीची माहिती मिळाली. त्याची पत्नी कल्याणमध्येच नातेवांकडे थांबलेली होती. शेजाऱ्याने सांगितले की, नकुलची आई प्रभा व नकुलचा भाऊ सुमित यांनी आठ महिन्यांच्या गरोदर रेखाला शिवीगाळ करत मारण करत व घरातील सामान बाहेर काढून तिला घराबाहेर काढलेले आहे. फ्लॅटच्या बाहेर सामान पडलेलं होतं. रेखा मात्र तिथे नव्हती. ती नातेवाइकांकडे गेली होती. नकुलने फ्लॅटचा दरवाजा ठोकवला, तर सुमितने दरवाजा उघडला आणि कशाला आलायस, असं त्याने प्रश्न विचारला, तर नको म्हणाला, माझं घर आहे म्हणून मी आलोय. माझ्या पत्नीला घरावर का काढलं, त्याचे उत्तर द्या. त्यावेळी नकुलची आई प्रभा धावत आली आणि नकुलच्या थोबाडीत मारू लागली. त्याचवेळी सुमितने घर माझ्या नावावर आहे. हे बघ कागदपत्र, असं तो नकुलला दाखवू लागला. हे बघून नकुलला धक्काच बसला. त्याचं घर भावाच्या नावावर कसं झालं, हेच त्याला समजेना. याच्या अगोदर तो आपल्या गरोदर पत्नीला भेटण्यासाठी निघाला आणि रस्त्यात विचार करू लागला.

नकुल हा सर्वसामान्यांसारखाच नोकरी करून आयुष्य जगणारा मध्यमवर्गीय. एक दिवस वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात बघून तो कल्याणला गेला व बिल्डिंग त्याचे प्लॅन लोकेशन या सगळ्या बेसिक गोष्टी बघून त्याने फ्लॅट बुक करण्याचं ठरवलं. पुढच्या वेळी जाताना त्याने दोन लाखांपर्यंत रक्कम घेतली व म्हात्रे नावाच्या बिल्डरला त्याने दोन लाख रुपये देऊन आपला रूम बुक केला व रक्कम कशा पद्धतीने द्यायची, कशी द्यायची व कर्ज कसं काढायचं, हे सगळं बिल्डरच्या ऑफिसमधून त्याला सांगण्यात आलं. त्याप्रमाणे त्याने प्रोसिजर सुरू केली व थोडी-थोडी रक्कम तो देऊ लागला. पूर्ण झाल्यावर त्यांनी बिल्डरशी बोलणे करून रूममध्ये पूजा घालून घेतली व त्यासाठी आपली आई, भाऊ, बहीण यांना गावावरून त्याने बोलवलं. पूजा व्यवस्थित पार पाडली. सर्व पाहुणे मंडळी गेल्यानंतर सुमितने त्याला एका बाजूला नेलं आणि तुझ्या घरासाठी कर्ज काढलेस का, असे विचारलं. मी ते कर्ज फेडतो, असं सुमित त्यावेळी म्हणाला. या घराचा अर्धा हिस्सा मला दे, असे तो त्यावेळी म्हणाला. पण त्या गोष्टीकडे नकुलने लक्ष दिलं नाही व आपल्या सख्खा भाऊ आहे आपल्याला काय फसवेल. म्हणून कामाच्या व्यापात असणारा नकुल बिल्डरसोबतच्या आर्थिक व्यवहार होते, ते त्यांनी सुमितवर सोपवले आणि नकुल सुमितला पैसे देत होता ते सुमित बिल्डरला नेऊन देत होता.

आणि एक दिवस हे माझं घर आहे माझ्या घरातून तुम्ही नवरा-बायको बाहेर पडा, असं तो म्हणू लागला. तर नकुल त्याला बोलला की व्यवहार तर मी पूर्ण केलेला आहे. घर तर मी खरेदी केलेले आहे, मग तू माझं घर कसं म्हणत आहे. सुमित बोलला हे घर माझं आहे आणि मी खरेदी केलेले आहे. त्याच्या होला हो त्याची आई प्रभावी देत होती आणि त्यांच्यात मोठे वाद झाले आणि सुमितने नकुलला मारझोड केली. त्याच्या आईने दोन-तीन कानाखाली नकुलच्या मारले आणि एवढ्यावर न थांबता त्या लोकांनी गरोदर रेखालाही मारलं. तो दिवस पूर्ण वादात गेला. हा असंच काहीतरी बोलत असेल, असं नकुलला या त्यादिवशी वाटलं, पण आज मात्र त्याने रेखाला घराबाहेर काढलं होतं. गरोदर असूनही त्यांनी माणुसकी दाखवली नाही. कामाच्या व्यापामुळे व गरोदर बायकोमुळे घराचे व्यवहार नकुलने सुमितकडे दिले होते आणि यातच तो फसला होता. तोपर्यंत रेखा ज्या पाहुण्यांकडे थांबली होती, तिला जाऊन भेटला. तिची समजूत काढली. काहीतरी होईल, मी बिल्डरला जाऊन भेटतो, असं तो म्हणाला आणि तिथून सरळ त्याने म्हात्रे बिल्डर गाठला. तर म्हात्रे बिल्डरने यावर काहीच उत्तर दिले नाही. बिल्डर आणि भावाने मिळून नकुलने घेतलेला रूम सुमितने आपल्या नावावर करून घेतला. जी रक्कम नकुल सुमितला देत होता. ती रक्कम बिल्डरला देताना सुमित मी देतोय असं सांगून खरेदी खतपासून तुमचे लाईट बिलपासून बिल्डरला हाताशी धरून स्वतःच्या नावावर करून घेतले होते. याची कानोकान खबर त्याने आपला मोठा भाऊ नकुला होऊ दिली नव्हती.नकुलकडे आता होतं ते सुरुवातीला भरलेलं पेमेंट आणि खरेदी खत.

सख्खा भाऊ कशाप्रकारे वैरी होऊ शकतो, हे आता नकुलला समजलं होतं. कामाच्या व्यापामध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याच भावावर त्याने प्रमाणापेक्षा जास्त विश्वास दर्शवून व्यवहार त्याच्या हातात दिला आणि स्वतःचा रूम घालून बसला. आपले व्यवहार आपण करावे. दुसऱ्यांवर विश्वास ठेवला, तर आपली घोर फसवणूक होते.

(सत्य घटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -