Saturday, May 25, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यात कोरोनाचे ७११ नवे रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचे ७११ नवे रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

मुंबईत दिवसभरात २१८ बाधित

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी राज्यात ७११ नवीन रुग्णांची नोंद झाली असून चार बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून मंगळवारी दिवसभरात २१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात मागील २४ तासांत झालेली ही वाढ १८६ टक्के इतकी आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात कोरोनाचे टेंशन वाढले आहे.

राज्यात मंगळवारी ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४४९ वर पोहोचली आहे. आज मृत पावलेल्या रुग्णांची संख्या पिंपरी चिंचवड मनपा – १, सातारा – २ आणि रत्नागिरी – १ अशी आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ४६ हजार ३०१वर पोहोचली आहे. एक दिवस आधी राज्यात २४८ रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात मागील सात दिवसात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्याचा मृत्यूदर हा १.८२ टक्के इतका आहे.

दरम्यान, राज्यात दिवसभरात ४४७ जणांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ७९ लाख ९४ हजार ६० जणांनी कोरोनाला हरवले आहे. राज्यात सद्यस्थितीत ३,७९२ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी ७५ नवीन रुग्णांची नोंद झाली होती, पण मंगळवारी बाधित रुग्ण संख्येत १५०ने वाढ झाली आणि तब्बल २१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५७ हजार ७४७ वर पोहोचली आहे. दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७४७ वर स्थिरावली आहे. दरम्यान, मुंबईत दिवसभरात १३५ जणांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत मुंबईत ११ लाख ३६ हजार ८३८ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. मुंबईत सध्या १,१६२ सक्रिय रुग्ण आहेत.

देशात ३,६४१ नव्या कोरोना रूग्णांची नोंद

देशातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,६४१ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून, १,८०० कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या वाढून २०,२१९ एवढी झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९८.७६ टक्के एवढा आहे. देशातील विविध राज्यात नव्याने वाढ होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ञांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -