Monday, June 17, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : चायनीज मॉडेल, नौटंकीबाज, स्वयंघोषित कुटुंबप्रमुख मातोश्रीच्या बाहेरही पडले नाहीत!

Nitesh Rane : चायनीज मॉडेल, नौटंकीबाज, स्वयंघोषित कुटुंबप्रमुख मातोश्रीच्या बाहेरही पडले नाहीत!

मविआचं महाराष्ट्रावरील प्रेम बेगडी; जनतेच्या गरजेच्या वेळी नेते गायब

डोंबिवली दुर्घटनेवरुन नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

मुंबई : डोंबिवली एमआयडीसी (Dombivali MIDC) परिसरातील अमुदान केमिकल्स कंपनीत काल भीषण स्फोट झाला. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत याचे हादरे बसले, तर घरांच्या आणि दुकानांच्या काचाही फुटल्या. यामुळे लागलेली आग दूरवर पसरत गेली आणि मोठी जीवितहानी झाली. आतापर्यंत या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यासंदर्भात भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळेस त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला.

नितेश राणे म्हणाले की, काल डोंबिवली एमआयडीसी परिसरात जी दुर्घटना झाली त्यावर राज्य सरकार म्हणून आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जाऊन पाहणी करुन आले. तसेच आमचे मंत्री रवींद्र चव्हाण देखील सातत्याने या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला प्रचाराकरता गेले असले तरी सर्वांच्या संपर्कात आहेत. म्हणजेच हे सर्व नेते खर्‍या अर्थाने कुटुंबप्रमुख कसे असतात याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने दाखवून देत आहेत. तर दुसर्‍या बाजूला स्वयंघोषित, चायनीज मॉडेल कुटुंबप्रमुख मातोश्रीच्या बाहेर निघायला तयार नाहीत, अशी जहरी टीका भाजपा प्रवक्ते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

पुढे ते म्हणाले, डोंबिवली एमआयडीसीमध्ये ना उद्धव ठाकरे फिरकले आहेत, ना त्यांचे चिरंजीव. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ज्यांना डोंबिवलीची फार काळजी लागली होती, मोठमोठी भाषणं आणि वायदे त्यांनी केले, पण आज जेव्हा डोंबिवलीकरांना खर्‍या मदतीची गरज होती, तेव्हा महायुतीचे आमचेच नेते त्या ठिकाणी पूर्ण वेळ उपलब्ध राहिले. पण हे नौटंकीबाज आपलं घरही सोडायला तयार नाहीत.

मविआचं महाराष्ट्रावरील प्रेम बेगडी

त्यांचा कामगार संजय राजाराम राऊत तर लंडनमध्ये भलतीच आग विझवायला गेल्याचं दिसतंय. तिथे पाण्याची फवारणी कशावर करतायत हा संशोधनाचा विषय आहे. अन्य वेळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन उगाच तोंडातून आग ओकायची, निवडणुकीच्या काळात आम्ही म्हणजे महाराष्ट्र, आमच्यावर अन्याय म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय. मग आता महाराष्ट्रातल्या डोंबिवली भागामध्ये जेव्हा लोकांना, जनतेला तुमची एवढी गरज आहे, तेव्हा हे तीनही विदूषक आपल्याला कुठेही दिसत नाहीत. म्हणजे यांचं महाराष्ट्रावरील प्रेम किती बेगडी आहे, हे या घटनेवरुन दिसतंय, असं नितेश राणे म्हणाले.

मविआच्या काळात केमिकल फॅक्टरीजकडून घेतले जायचे हप्ते

अंबादास दानवेंनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, मविआच्या काळात आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होता. मला आठवतं की, तेव्हा सगळ्या केमिकल फॅक्टरीजकडून मातोश्रीमधून हप्ते घेतले जायचे. ज्यांचे हप्ते वेळेत यायचे नाहीत, त्यांना नोटिसी पाठवण्याचं काम हा पेंग्विन ठाकरे करायचा. म्हणून उद्धव ठाकरेंनी काय दिवे लावले आहेत, आणि कंपन्यांना कसं ब्लॅकमेल केलं जायचं याचे सगळे पुरावे अंबादास दानवेंना देतो, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -