Sunday, June 16, 2024
Homeनिवडणूक २०२४Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचा मराठवाडा दौरा; घेणार दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा!

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचा मराठवाडा दौरा; घेणार दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा!

उपायोजना आखण्यासाठी आचारसंहिता शिथील करण्याची निवडणूक आयोगाकडे केली विनंती

छ्त्रपती संभाजीनगर : एकीकडे निवडणुकीचे (Loksabha Election 2024) वारे तर दुसरीकडे उन्हाच्या लाटांनी महाराष्ट्र चांगलाच तापला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र पुन्हा महाराष्ट्रात उकाड्याने चांगलाच पेट घेतला आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झालेच आहेत त्यासोबत प्राण्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

अशातच सध्या मराठवाड्यात (Marathwada) दुष्काळाची परिस्थिती आणखी भीषण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दुष्काळासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. त्याचसोबत या बैठकीला सर्व जिल्हाधिकारी, पालकमंत्री, कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी यासह इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

‘असा’ घेणार दुष्काळी परिस्थितीचा आढवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजता छत्रपती संभाजीनगर मधील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची आणि भीषण पाणी टंचाईवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. याबाबत तत्काळ मदत कशी आणि कोणती करावी याचंही नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पाळीव प्राण्यांना लागणाऱ्या चाऱ्याचा पुरवठा कसा करावा, या संदर्भातदेखील या बैठकीत चर्चा होणार आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

आचारसंहिता शिथील करण्याची मागणी

आगामी काळात ही स्थिती जास्तच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ मदत आणि उपायोजनांची गरज आहे. मात्र निवडणुकीमुळे राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अशा स्थितीत मराठवाड्यासह इतर दुष्काळसदृश भागांना मदत करताना अडचणी येत आहेत. राज्यातील काही भागातील दुष्काळसदृश स्थिती लक्षात घेता त्यांना मदत करण्यासाठी, उपायोजना आखण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी, अशी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे.

दरम्यान राज्य सरकारच्या या विनंतीवर निवडणूक आयोग विचार करत आहे. आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -