Sunday, June 16, 2024
Homeक्रीडाIPL 2024RR vs RCB: राजस्थानने विजयासह दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मिळवले स्थान, RCBला ४ विकेटनी...

RR vs RCB: राजस्थानने विजयासह दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मिळवले स्थान, RCBला ४ विकेटनी हरवले

मुंबई: राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४ विकेटनी हरवले. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने या विजयासह दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश घेतला आहे. आता त्यांचा सामना २४ मेला सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. आरसीबीने एलिमिनेटरमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना २० षटकांत ८ विकेट गमावत १७२ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात राजस्थानने १९ षटकांत ६ विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले.

आरसीबीसाठी कोहलीने २४ बॉलमध्ये ३३ धावा केल्या. महिपाल लोमरोरने १७ बॉलमध्ये ३२ धावा केल्या. तर ग्रीन २७ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. आरसीबीसाठी बॉलिंग करताना सिराजने २ विकेट मिळवल्या. फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि ग्रीनने १-१ विकेट मिळवला.

राजस्थानसाठी यशस्वीने चांगली बॅटिंग केली. त्याने ३० बॉलमध्ये ४५ धावा केल्या. रियान परागने २६ बॉलमध्ये ३६ धावा केल्या. हेटमायरने १४ बॉलमध्ये २६ धावा केल्या. संजू सॅमसनने १७ धावा केल्या. राजस्थानसाठी बॉलिंग करताना आवेश खानने ३ विकेट घेतल्या. बोल्ट, संदीप आणि चहलने १-१ विकेट घेतल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -