Monday, June 17, 2024
Homeताज्या घडामोडीJalgaon news : जळगावमध्ये तीव्र उष्णतेमुळे गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला!

Jalgaon news : जळगावमध्ये तीव्र उष्णतेमुळे गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला!

तापमान ४४ अंश सेल्सियसवर गेल्याने घडली दुर्घटना

जळगाव : राज्यभरात सूर्य आग ओकत असून उन्हाचा तीव्र तडाखा (Intense heat) बसत आहे. काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत असल्या तरी उन्हाची समस्या कायम आहे. मराठवाड्यासह विदर्भात तर तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाणीटंचाईची समस्याही भेडसावत आहे. धुळे (Dhule), जळगावमध्ये (Jalgaon) उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. या जिल्ह्यांत तापमान ४४ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. यामुळेच जळगावमध्ये उन्हाच्या तडाख्याने एका ट्रकला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची मोठी लाट पसरली आहे. जळगावातील जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अचानक एका ट्रकने पेट घेतला. या ट्रकमधून गव्हाच्या पोत्यांची वाहूतक करण्यात येत होती. या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले, मात्र अग्निशमनचे बंब येईपर्यंत ट्रकचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गव्हाच्या पोत्यांचेही नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी दुपारच्या प्रहरात अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -