Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीBhandara News : भंडाऱ्याच्या बळीराम गौशाळेत चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू!

Bhandara News : भंडाऱ्याच्या बळीराम गौशाळेत चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू!

निर्दयी अवस्थेत जनावरांना ठेवलं होतं बांधून

भंडारा : भंडाऱ्याच्या (Bhandara news) पवनी येथील बळीराम गौशाळेतून (Baliram cowshed) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू (Animals dead) झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीतील (Gadchiroli) कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरीतील बळीराम गौशाळेत पाठवलं होतं. मात्र, बळीराम गौशाळेत चारा आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने ३० जनावरे मृत पावली. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे.

गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करुन भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत त्यांना पाठवलं होतं. मात्र, गौशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचं शेड नव्हतं. त्यामुळे ही सर्व जनावरे निर्दयीपणे उघड्यावर ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दरम्यान, यातील ३० जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी समोर आली.

विशेष बाब म्हणजे, मागील वर्षी बळीराम गौशाळेच्या अध्यक्षांसह १३ संचालकांवर गौशाळेतील जनावरे विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या गौशाळेकडून गुन्हा घडला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -