Friday, May 10, 2024
Homeदेश18 OTT Apps Ban In India : ऑनलाईन माध्यमांतील 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मसह...

18 OTT Apps Ban In India : ऑनलाईन माध्यमांतील ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मसह देशातील १९ वेबसाईट, १० अॅप्स, ओटीटी प्लॅटफॉर्मचे ५७ सोशल मीडिया हॅंडलवर बंदी

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : ऑनलाईन माध्यामांतील ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सततच्या अश्लिल कॉन्टेंटमुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १८ ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. या ओटीटी प्लॅटफॉर्मसह देशातील १९ वेबसाईट, १० अॅप्स, ओटीटी प्लॅटफॉर्मचे ५७ सोशल मीडिया हॅंडल देखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्लॅटफॉर्मवर अश्लील वेब सीरिज, चित्रपट दाखवले जात होते. सरकारने याबाबत संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी अश्लील चित्रपट, वेब सीरिज हटवले नाही. त्यामुळे ऑनलाईन माध्यमांतून महिलांचे अशोभनीय प्रतिनिधीत्व कायद्यासह अनेक कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आल्यानंतर सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे.

अश्लील साहित्याचा प्रसार करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचा इशारा याआधीच केंद्र सरकारने दिला होता. गेल्या वर्षीही जून महिन्यात यासंदर्भात मंत्रालयात मोठी बैठक झाली होती.

या प्लॅटफॉर्मवर एका कंटेटचा मोठा भाग हा अश्लील, आक्षेपार्ह आणि महिलांसाठी अपमानास्पद असल्याचे आढळून आले. समाजाचे नैतिक अध:पतन होईल असा प्रकारचा मजकूर होता. अनेक वेब सीरिजमध्ये शिक्षिका-विद्यार्थ्यांमध्ये आणि कौटुंबिक नातेसंबंधातील व्यक्तींमध्ये शरीर संबंध असल्याचे दाखवण्यात आले होते.

बंदी घालण्यात आलेल्या एका ओटीटी अॅप्सला एक कोटींहून अधिक डाउनलोड करण्यात आले आहे. दोन अन्य प्लॅटफॉर्ममध्ये Google Play Store वर ५० लाखांहून अधिक डाउनलोड झाले. त्याशिवाय, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया हँडलवर अश्लील ट्रेलर, दृष्य अतिरंजीत पद्धतीने दाखवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

ब्लॉक केलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मची संपूर्ण यादी

ड्रीम्स फिल्म्स
Voovi
अनकट अड्डा
ट्री फ्लीक
एक्स प्राईम
नीऑन एक्स व्ही आय पी
बेशरम्स
हंटर्स
रॅबिट
एक्स्ट्रामुड
नीओफ्लीक्स
मूड एक्स
मोजफ्लिक्स
हॉट शॉट व्हीआयपी
फुगी
चिकूफ्लिएक्स
प्राईम प्ले
येस्मा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -