Wednesday, June 26, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023world cup 2023: पाकिस्तानने सोपे केले सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण, न्यूझीलंडला धोका

world cup 2023: पाकिस्तानने सोपे केले सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण, न्यूझीलंडला धोका

मुंबई: पाकिस्तानने आपल्या दमदार कामगिरीने विश्वचषक २०२३मध्ये सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग सोपा केला आहे. ज्या पाकिस्तानसाठी एक आठवड्याआधी घरवापसची मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत होते त्यांनी शनिवारी न्यूझीलंडला अगदी सहज हरवले. तेही अशा सामन्यात जिथे न्यूझीलंडने तब्बल ४०१ असा धावसंख्येचा डोंगर उभारला होता. मात्र फखर जमांच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने हा डोंगरही पार केला.

पाकिस्तानच्या या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये त्यांचे ८ अंक झाले आहेत. न्यूझीलंडचेही तितकेच गुण आहेत. न्यूझीलंडने सलग चार सामन्यात पराभव पत्करला आहे. या कारणामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला आहे. आता दोन्ही संघाचे एक एक सामने बाकी आहेत. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे ८-८ अंक आहेत. अशातच पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता किती आहे जाणून घेऊया.

विश्वचषक २०२३च्या सेमीफायमलचे समीकरण समजण्याआधी पॉईंट टेबलवर नजर टाकूया. भारत १४ अंकांसह आणि दक्षिण आफ्रिका १२ अंकांसह टॉप २मध्ये आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाचे ८-८ गुण आहेत. या चारही संघांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी लढत सुरू आहे.

न्यूझीलंडवरील विजयाने बदलले समीकरण

पाकिस्तानने शनिवारी न्यूझीलंडला २१ धावांनी हरवले. न्यूझीलंडने या सामन्यात ४०१ धावा केल्या. जेव्हा पाकिस्तानने फलंदाजी सुरू केली तेव्हा दोनदा पावसाने खोडा घातला. संध्याकाळी साडे सात वाजता ठरले की हा सामना पूर्ण होऊ शकत नाही. यानंतर पाकिस्तानला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. जेव्हा विजेता घोषित करण्याचा आला तेव्हा पाकिस्तानने २५.३ षटकांत एक बाद २०० धावा केल्या होत्या. या विजयासह त्यांचे पॉईंट ८ झाले आहेत. रनरेट कमी असल्याने पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे.

आता पाकिस्तानला काय करावे लागेल?

पाकिस्तानचा पुढील सामना इंग्लंडसोबत ११ नोव्हेंबरला आहे. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर त्यांचे १० पॉईंट होतील. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडला हरवल्यानंतर पाकिस्तानचा नेट रनरेट प्लसमध्ये आला आहे. जर त्यांनी इंग्लंडला ४० धावांनी हरवले तर त्यांचा रनरेट न्यूझीलंडपेक्षा सुधारेल.

न्यूझीलंडने श्रीलंकेला हरवले तर…

न्यूझीलंडचा संघही या सेमीफायनलच्या शर्यतीत सामील आहे. मात्र खेळाडूंच्या दुखापती त्यांची पाठ काही सोडत नाहीत. न्यूझीलंड संघाने सलग चार सामने गमावले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडने शेवटचा सामनाही हरावा असे पाकिस्तानला नक्कीच वाटत असणार आहे. न्यूझीलंडचा पुढील सामना श्रीलंकेशी ९ नोव्हेंबरला आहे.

अफगाणिस्तानसमोर दिग्गज संघांचे आव्हान

अफगाणिस्तानचा संघही सेमीफायनलच्या शर्यतीत आहे. मात्र त्यांचे उरलेले दोन सामने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. निश्चितपणे अफगाणिस्तान संघासाठी या दोन संघांना हरवणे कठीण जाईल. जर अफगाणिस्तानने आपले दोन्ही सामने गमावले तर ते सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जातील.

पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान तिन्ही संघ जिंकले तर

जर असे झाले की पाकिस्तान, न्यूझीलंड,अफगाणिस्तान तीनही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे तर नेट रनरेटवरून सेमीफायनलमध्ये कोणता संघ जाईल हे ठरवले जाईल. अफगाणिस्तानचा नेट रनरेट -०.३३० आहे. अशातच नेट रनरेटवरून गणित सोपे केले जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -