Wednesday, June 26, 2024
Homeमहत्वाची बातमीसंजय पांडे यांना आघाडी सरकार मोकळीक देईल का

संजय पांडे यांना आघाडी सरकार मोकळीक देईल का

विजयकुमार काळे

न्यायमूर्ती महाराज ; मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे यांचे अभिनंदन करायला हरकत नाही ना?? अवमान वगैरे ….!!!

माझ्या या पोस्टचा मथळा वाचून आपण गोंधळून गेला असाल नाही ? खरेतर संजय पांडे यांचे थेट अभिनंदन करायला हरकत नसावी परंतु हल्ली समाजप्रेमींना ‘ जनहित ‘ कशात दिसेल याची खात्री देता येत नाही कारण अवघ्या काही दिवसांपूर्वीच संजय पांडे यांच्या प्रभारी पोलिस महासंचालक पदासंदर्भात न्यायालयाने तिखट निरीक्षण व्यक्त केले होते आणि आता त्याच पांडे यांची नेमणूक राज्य सरकारने मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी केली आहे म्हणून मनात धुगधुगी आहे. खरे तर प्रत्येक आय पी एस अधिकाऱ्यांचे स्वप्न मुंबईचे आयुक्तपद हेच असते पोलिस महासंचालक हे पद सर्वात मोठे आहे यात वादच नाही पण मुंबानगरी भोवती जे अंगभूत वलय आहे त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना मुंबई खुणावत असते. मुंबईचे आयुक्तपद न मिळाल्याने हताश झालेले काही अधिकारी मी पाहिलेले आहेत.असो आज तो विषय नाही. संजय पांडे यांच्याबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही .पांडे हे कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. तरीही त्यांच्याबाबत काही नाहक प्रश्न ‘ जनहिताच्या ‘ नावाखाली विचारले गेले आणि त्यावर न्यायालयाने तिखट निरीक्षण नोंदवले हे सर्वजण जाणताच. न्यायालयाच्या त्या तिखट निरीक्षणावर महाअधिवक्त्यांनी जोरदार उत्तर द्यावे अशी अपेक्षा होती .परंतु महाअधिवक्त्यांनी निराशा केली असेच म्हणावे लागेल. आय पी एस अधिकाऱ्यांपैकीच कोणाच्यातरी नेत्रपल्लवी मुळेच ही जनहित याचिका करण्यात आली होती अशी कुजबुज महासंचालक कार्यालय परिसरात अजूनही करणयात येत आहे त्या जनहित याचिकेची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचिकाकर्ते खुद्द वकील असूनही बाजू मांडण्यासठी एक तगडा वकील बोलावला गेला असो नियमानुसार असा वकील करता येतो हे जरी खरे असले तरी खटकणारे नक्कीच होते यावर आता जास्त न बोलणेच बरे असे जरी असले तर ‘ जनहिताची ‘ उबळ पुन्हा येणारच नाही असे नाही ती पुढे आली तर त्याचाही जमेल तितका समाचार घेऊच महासंचालकपदाचा प्रभारी भार सांभाळताना पांडे यांना न्यायालयाच्या कामालाही वेळ द्यावा लागला होता त्यामुळे अर्थातच त्यांच्या कामात पुरेसा अडथळा निर्माण झाला होता आयुक्तपदाची मुदतही कमी मिळत आहे म्हणूनच राज्य सरकारला विनंती राहील की पांडे यांची मुदत संपली की त्यांना मुदतवाढ देण्यात यावी.

संजय पांडे यांची नव्याने ओळख करून द्यायला नको. एक धडाडीचे पोलिस अधिकारी म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. मुंबई शहरालाही एका धडाडीच्या अधिकाऱ्यांची गरज होतीच. शिस्तीच्या रुळावरून मुंबई पोलिसांची गाडी घसरलेली आहे .संपूर्ण शहरात पोलिसांची जरब म्हणून नाही असा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना प्रत्ययही येत असतो. तसेच अनेक ठिकाणी पोलिसांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. सर्वात खटकणारी गोषट म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही हल्ली कामाकडे लक्ष नसते असे दिसून आले आहे पोलिस आयुक्त कार्यलयापासून अवघ्या पन्नास पावलांवर असलेल्या लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यातील खंडणीचा प्रकार पोलिसांना मान खाली घालायला लावणारा आहे संतापाची बाब म्हणजे एक आय पी एस अधिकारी यात सामील असल्याचा संशय आहे आपल्या कणखर स्वभावानुसार पांडे हे सर्व अनुचित प्रकार थांबवतील असा भरवसा आहे पोलिस ठाण्यात सामान्य माणसाला मिळणारी वागणूकही चिंतेचा विषय आहे

” पतीवरता मैली भली , काली कुचित कुरूप |

पतीवरता के रूप पर , चारो कोटी सरूप || ” असे कबीरजीनी सांगितले आहेच. याच धर्तीवर सांगू इच्छितो की पांडे यांच्या कडे छक्के पंजे नाहीत आहे ते थेट बोलणे आहे शिस्तीला धरून आणि नियमांवर बोट ठेवून ! नवीन आयुक्तांकडून जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आहेत —

” ते तिकडून धरतात
हे इकडून धरतात
ते मारल्यासरखे करतात
हे रडल्यासारखे करतात ” ( देवा झिंगाड ) असा कारभार जनतेला नकोय.

जरब असलेला पोलिस अधिकारी जनतेला हवा आहे ” a true police officer fights not because he hates what in trust of him , but because he loves who stands behind him ” जनतेनेही चांगल्या पोलिस अधिकाऱ्यांना पाठिंबा देण्याची कधी न्हवे इतकी आज गरज आहे. नवनियुक्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांना विकास आघाडी विनाअडथळा काम करू देईल?दिले पाहिजे.

” त्याच त्याच कविता ऐकून जीव आलाय कानात
अन उद्या एखादी नवीन कविता ऐकायला कवींना नेऊन हाणावे लागेल रानात ” (देवा झिंजाड )

केवळ कवितेच्या प्रांतातच असे आहे असे कवीला सुचवायचे नसेल असे मानू या खरे तर समाजाच्या एकूण एक स्तरात तोचतोच पणा साचलेला आहे एखाद दुसरा राजकीय नेता किंवा अधिकारी हा साचलेला गाळ काही साफ करू शकत नाही हे समाजाला ही कळू लागले आहे संजय पांडे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जादूच्या कांडी प्रमाणे सर्व काही ठीक होईल या भ्रमात कोणी राहू नये. सर्वकाही ठीक होण्यासाठी समाजानेही थोडी तोशीस सोसणे गरजेचे असते तसे वातावरण सध्यातरी कोठेच नाही हे खेदाने नमूद करावे लागत आहे तरीही संजय पांडे यांचे नाव घेतले तरी जनतेच्या मनात एक आदरभाव आहे हे मान्य करावेच लागेल. गेल्या 25 /30 वर्षांपासून मुंबई पोलिस दलाची प्रतिमा बरीच धूसर झाली आहे काही कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांनी प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही परंतु त्या प्रयत्नांना ना समाजाने पाठिंबा दिला ना राजकारण्यांनी दिला . शिवाय पोलिस हवालदारांपासून तो अधिकारीवर्गा पर्यंत पुरेसे मनुष्यबळ कधीच न्हवते त्यातच अनेक पोलीसेतर कामे पोलिसांच्या माथी मारून त्यांना कमकुवत केले गेले ज्या पोलिसांनी जनतेचे संरक्षण केले पाहिजे त्या पोलिसांना राजकीय नेत्यांच्या पुढेमागे संरक्षण देण्याच्या कामास जुंपण्यात आले काही प्रमुख नेत्यांच्या संरक्षणा विषयी प्रश्न नाही परंतु पोलीस संरक्षणाचे हे फॅड नगरसेवक वा जिल्हा स्तरापर्यंत पोचते तेव्हा ते निश्चितच हास्यास्पद ठरते अनेक ग्रामीण भागात प्रमुख नेत्यांचे पाहून गावठी नेते ही आता बाहुबली ठेवू लागले आहेत ( या बहुबलीचा काहीच फायदा होत नसतो ठाण्याजवळील एका गावात एका गावठी नेत्याने असेच संरक्षण ठेवले आहे ते ही 24 तास या संरक्षणातच शेजारचे घर दरोडेखोरांनी गेल्या आठवड्यात साफ केले आहे ) थोडे विषयांतर झाले पण ते आवश्यक होते या संरक्षणातील फोल पणा सिद्ध करण्यासाठी.

मुंबई शहरासमोर अनेक समस्या आहेत बऱ्याच प्रमाणात सुरक्षित असलेले हे शहर बरेचसे असुरक्षित आहे या शहराची लोकसंख्या वाढली आहे त्या प्रमाणात नसेल पण पोलिस ठाण्यांची संख्याही वाढलेली आहे पोलिस स्थानकाना वाहनेही पूरविण्यात आलेली आहेत जुने घोडे बदलून नवीन घोडे देण्यात आलेले आहे अनेक ठिकाणी फुरर करणाऱ्या बाईक्स ही आहेत अवतीभवती टिप्स देणारी पंटर ही आहेत आवश्यक त्या बहुतेक सोयी पुरवल्या गेल्या असतानाही गुन्हेगारीचे प्रमाण मात्र वाढत आहे काही प्रकरणात शोध मोहीम चांगली असते पण गुन्हेगाराला शिक्षा होत नाही सर्वात महत्वाचा दोष म्हणजे पोलिस ठाण्यात तक्रारदाराला किंमत देण्यात येत नाही त्याच्याशी कधीच चांगले वागत नाहीत उलटसुलट प्रश्न विचारून त्याला निरुत्तर केले जाते गेल्या काही वर्षांपासून आर्थिक गुन्हेगारी कमालीची वाढली आहे सायबर गुन्हे ही वाढले आहेत

आयुक्त साहेब आर्थिक गुन्ह्यांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे आर्थिक मध्ये पैसा मध्यवर्ती असला तरी फसवण्याच्या पद्धती वाढल्या आहेत अधिक स्मार्ट झाल्या आहेत आपल्याला जाणीव असेलच की गरीब आणि मध्यमवर्गीय माणसे घरांसाठी किती वणवण फिरत असतात किडुक मिडुक जमवून वा विकून हक्काचे घर घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो परंतु बिल्डर नामक महा बिलंदर प्राणी त्यांना सारखा फसवत असतो अनेक बिल्डर्स नी जनतेकडून पैसे उकळून शेकडो प्रकल्प अर्थवट सोडलेले आहेत मुंबई शहर आणि त्याच्या दोन्ही उपनगरात अशे शेकडो प्रकल्प वा त्यांचे सांगाडे उभे राहिलेले दिसतील जनतेकडून भक्कम पैसे घेऊन प्रकल्प लटकवणारे अनेक आहेत आमच्या कडील पैसे संपले असे हे बिल्डर सांगतात व स्वतः मात्र श्रीमंतीत राहतात चेंबूर , घाटकोपर , विक्रोळी , कांजूरमार्ग , भांडुप , मुलुंड , खार , अंधेरी, गोरेगाव , मालाड , कांदिवली अनेक नावे सांगता येतील या अर्धवट सांगाड्यांचे गूढ शोधून काढा पुनर्विकास योजनेत ही बरीच गडबड आहे अनेक सहकारी बँकांनी हजारो कोटींचा गफला केला आहे हे काम म्हणजे हिमालय उचलण्यासारखेच आहे राहत इंदोरीं च्या दोन ओळींनी समारोप करतो आणि आपल्याला सुयश चित्तींतो.

” आप ने सिर्फ गिराने की अदा सिखी है
और हम गिर के संभलने का हुनर जानते है .

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -