Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीMaratha Andolan : मराठा आंदोलनासाठी उपोषण करणारा तरुण स्टेजवरुन कोसळला!

Maratha Andolan : मराठा आंदोलनासाठी उपोषण करणारा तरुण स्टेजवरुन कोसळला!

डोक्याला व डोळ्याला जबर मार

परभणी : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्यभरातील मराठे आता पेटून उठले आहेत. उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठ्यांना गावागावात साखळी उपोषण करण्याचं आणि शांततेने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानुसार राज्यभरातील गावागावांमध्ये अनेक मराठा बांधवांनी उपोषणासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, याचा परभणीतील (Parbhani News) एका उपोषणकर्त्याला प्रचंड त्रास झाला आहे. तीन दिवस पाणीही न घेतल्याने स्टेजवरुन कोसळून त्यांच्या डोक्याला व डोळ्याला जबर दुखापत झाली आहे.

परभणीच्या पालम तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी नरसिंग रोकडे, ओमकार सिरस्कर आणि माणिक सिरस्कर हे तीन जण आमरण उपोषण करत आहेत. या तिघांनीही गेल्या तीन दिवसांपासून अन्न आणि पाणी न घेतल्याने या तिघांपैकी ३५ वर्षीय माणिक रुस्तुमराव सिरस्कर यांची प्रकृती अत्यंत खालावली. आंदोलन स्थळीच अचानक चक्कर आल्याने उपोषणासाठी तयार करण्यात आलेल्या स्टेजवरून ते खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर दुखापत होऊन मार लागला आहे.

माणिक सिरस्कर यांना ताबडतोब पालम ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे आरोग्य कर्मचारी नसल्याने उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी गावागावात अनेक तरुण अशा पद्धतीने उपोषण करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -