Thursday, May 9, 2024
HomeदेशRahul Gandhi: दरवर्षी १ कोटींची कमाई, हातात फक्त ५५ हजार कॅश, जाणून...

Rahul Gandhi: दरवर्षी १ कोटींची कमाई, हातात फक्त ५५ हजार कॅश, जाणून घ्या राहुल गांधींची संपत्ती

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४ पाहता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनी बुधवारी केरळच्या वायनाड मतदारसंघातून आपले नामांकन दाखल केले. राहुल गांधींनी नामांकन भरण्याआधी प्रियंका गांधींसोबत वायनाडमध्ये रोड शोही केला.

राहुल गांधींकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जातील माहितीनुसार त्यांनी दरवर्षी १ कोटींची कमाई केली आहे, २०२२-२३ या आर्थिक वर्षात राहुल गांधींची वार्षिक कमाई १,०२,७८,६८० रूपये इतकी होती. २१-२२मध्ये काँग्रेस नेत्याने १,३१,०४,९७० कोटी रूपये कमावले. २०-२१मध्ये १,२९,३१,११० कोटी कमावले. १९-२०मध्ये १,२१,५४,४७० कोटी आणि १८-१९मध्ये १,२०,३७,७०० कोटी रूपये कमावले.

४ कोटींपेक्षा अधिक शेअर

काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या बँक अकाऊंटमध्ये २६,२५,१५७ रूपये जमा आहेत. तर त्यांच्याकडे रोख रकमेच्या रूपात ५५ हजार आहेत. राहुल गांधींकडे यंग इंडियनचे १९०० शेअर आहेत जे १०० रूपये प्रति शेअर दराने आहेत. याशिवाय काँग्रेस खासदाराकडे ४,३३,६०, ५१९ रूपयांचे इतर कंपन्यांचे शेअर आहेत.

राहुल गांधींकडे ३,८१,३३,५७२ रूपयांचे म्यच्युअल फंड्स आणि सॉवरेन गोल्ड बाँड्समध्येही त्यांनी १५,२१,७४० रूपये गुंतवले आहेत. त्यांनी पोस्ट ऑफिस, विमा पॉलिसीमध्ये ६१,५२,४२६ रूपयांची गुंतवणूक केली आहे. वायनाड खासदाराकडे एकूण ४,२०,८५० रूपयांचे दागिने आहेत. राहुल गांधीची एकूण जंगम मालमत्ता ९,२४,५९,२६४ रूपयांची आहे.

राहुल गांधींकडे स्वत:चे घर नाही

राहुल गांधींकडे स्वत:चे कोणतेही घर नाही. दरम्यान, गुरूग्राममध्ये त्यांच्या नावावर दोन कमर्शिय बिल्डिंग आहेत. यांची किंमत ९ कोटींपेक्षा अधिक आहे.

वायनाड मतदारसंघातून जोरदार टक्कर

यावेळेस वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींचा मार्ग सोपा दिसत नाही आहे. भाजपने राहुल गांधींला वायनाड मतदारसंघात घेरण्यामध्ये कोणतीही कसर मागे सोडलेली नाही. पक्षाने वायनाड मतदारसंघातून केरळचे भाजप अध्यक्ष के सुरेंद्रन यांना उमेदवार बनवले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -