Tuesday, May 7, 2024
HomeदेशPM Narendra Modi: कलम ३७० हटवल्यानंतर आज पहिल्यांदा काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi: कलम ३७० हटवल्यानंतर आज पहिल्यांदा काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) गुरूवारी जम्मू-काश्मीरचा(jammu-kashmir) दौरा करतील. या दौऱ्या दरम्यान ते राज्याला ६४०० कोटी रूपयांच्या विकास परियोजनांची भेट देतील. तसेत १००० तरूणांना नोकरीसाठीचे नियुक्तीपत्रक देतील. पंतप्रधान श्रीनगरच्या बख्शी स्टेडियममध्ये लोकांना संबोधित करतील.

काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. याआधी २०१९मध्ये नरेंद्र मोदी प्रचारासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे श्रीनगरमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. भाजपचा दावा आहे की या जनसभेमध्ये २ लाखाहून अधिक लोक सामील होतील.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान ७ मार्चला दुपारी १२ वाजता श्रीनगरच्या बख्शी स्टेडियममध्ये पोहोचतील. तेथे ते विकसित भारत विकसित जम्मू-काश्मीर कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान जम्मू-काश्मीरमध्ये कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तब्बल ५००० कोटी रूपयांचा कार्यक्रम- समग्र कृषी विकास कार्यक्रम राज्याला समर्पित करतील. अनेक योजनांचा यावेळी शुभारंभ करतील.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल १००० व्या सरकारी कर्मचाऱ्यांन नियुक्ती पत्र वितरित करतील तसेच विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींशी चर्चाही करतील. भारतात पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा अभियानाची सुरूवात करतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -