Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाAsia cup: आशिया चषकात पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का

Asia cup: आशिया चषकात पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का

कोलंबो: फलंदाज बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या पाकिस्तानी संघाला आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) मोठा झटका बसला आहे. संघाचा सुपरस्टार खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर गेला आहे. पाकिस्तानला आशिया चषकमध्ये सुपर ४मध्ये आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे.

स्पर्धेबाहेर गेला हा क्रिकेटर

पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर नसीम शाह दुखापतीमुळे आशिया चषकातील बाकी सामन्यातून बाहेर गेला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घोषणा केली आहे की वेगवान गोलंदाज नसी शाहच्या जागी जमान खानला आशिया चषकात सामील केले जाईल. भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सुपर ४मधील सामन्यात नसीमच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर मेडिकल टीम लक्ष देऊन आहे. भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकप लक्षात घेता सर्व आवश्यक सावधानता बाळगली जात आहे.

रिप्लेसमेंटची घोषणा

आशिया चषक संघात नसीम शाहच्या जागी २२ वर्षीय जमान खानला सामील केले आहे. वेगवान गोलंदाज जमान खानने टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. पाकिस्तानसाठी त्याने ६ टी-२० सामन्यात त्याने ३२.५०च्या सरासरीने ६.६६च्या इकॉनॉमीने ४ विकेट घेतल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -