Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीGaneshotsav : दै. प्रहारतर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

Ganeshotsav : दै. प्रहारतर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

मुंबई : यावर्षीही (Ganeshotsav) दै. प्रहारतर्फे ‘घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२३’चे (Home Ganesha Decoration Competition) आयोजन केले आहे. विजेत्यांना मान्यवर व्यक्तींच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व पारितोषिक देण्‍यात येणार आहे.

गणराया हा सर्वांचा लाडका बाप्पा आहे. त्यामुळेच गणपती उत्सवात केवळ सावर्जनिक मंडळेच सजावट करीत नाहीत. तर बालगोपाळ आपापल्या घरी गणपतीची स्थापना करताना मोठ्या प्रमाणात सजावट करतात. ही बाब लक्षात घेवूनच या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत जास्तीत गणेश भक्तांनी सहभागी व्हावे, आणि या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी

दक्षिण मुंबई : 9869758800/7977464360,

पश्चिम मुंबई : 9769850854/8369550026,

मध्य मुंबई : 8108029441,

नवी मुंबई/पनवेल : 8169212198,

आणि व्हाटसअप क्रमांक 9372832076

येथे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेकरीताचे नियम, अटी व निकष खालीलप्रमाणे…

१) घरगुती गणपती सजावट स्पर्धा ५-७-१० दिवसांच्या गणपतीसाठी असेल.

२) स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. १००/- आकारली जाईल.

३) स्पर्धा फॉर्म भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाइल नं. आणि किती दिवसांचा गणपती ते नमूद करावे.

४) संपूर्ण भरलेला फॉर्म प्रहार कार्यालयात किंवा प्रतिनिधीकडे दिनांक २०/०९/२३ पर्यंत मिळेल, अशा बेताने जमा करावा.

५) सजावट पाहण्यासाठी ‘प्रहार’तर्फे निरीक्षक व प्रहारचा प्रतिनिधी घरी येऊन पाहणी करतील.

६) निरीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

७) सजावट व्हीडिओ व्हाटसअप क्रमांक 9372832076 येथे पाठविणे, त्याला प्रहार वेबसाईट आणि सोशल मिडीयावर प्रसिद्धी देण्यात येईल.

८) बक्षीस समारंभाची तारीख, वेळ, ठिकाण नंतर ‘प्रहार’ मध्ये प्रसिद्ध केले जाईल. व्हॉटसअप नंबर फॉर्ममध्ये देण्यात येईल.

९) बक्षीसपात्र व्यक्तीने सोबत ओळखपत्र जसे आधारकार्ड, पॅनकार्ड किवा शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.

१०) प्रहारचे कर्मचारी व त्यांच्या परिवारास स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

११) स्पर्धेसाठीचा देण्यात येणारा फॉर्म ‘प्रहार’ अंकात प्रसिद्ध करण्यात येईल आणि तोच फॉर्म ग्राह्य धरण्यात येईल.

१२) स्पर्धेचे सर्वाधिकार ‘प्रहार’ कार्यालयाकडे राखून ठेवण्यात येतील. स्पर्धा फक्त मुंबई, ठाणे, पालघर, रायगड मर्यादित राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -